कामाठीपुरा : प्रकरण 1️⃣0️⃣
वृत्त एकसत्ता न्यूज
संकलन : आकाश भाग्यवंत नायकुडे
अकलूज दिनांक1/8/2026 :
*जीपमध्ये बसलेले सहाही जण हातात सळ्या आणि चॉपर घेऊन सुसाट धावत सुटले.*
पासकीन मामा झपकन वळला. चटईतली त्याची गुप्ती त्याने ताब्यात घेतली. पावट्या धावला. त्याने चॉपरला हात घातला, नितीन काण्याने सळई उचलली, लट्याने चकाकत्या तलवारीच्या मुठीवर आपली पकड घट्ट केली.
पासकीन मामाने शिसवीच्या तेल लावलेल्या पितळी वेलबुट्टी असलेल्या म्यानातून सापकन लकाकती गुप्ती बाहेर खेचली.
लट्याने तेवढ्या वेळातच तलवारीची धार चेक करून रक्ताळलेला अंगठा ओठांनी चुसला.
पावट्याने त्याचा दुधारी चॉपर मांडीशी लावून पँटला पुन्हा पुसला. अन नितीन भाय सळ्या घेऊन शान्त्यादाच्या बाजूला सरकला.
शान्त्यादा मध्ये उभा.
आता हे सगळे असे उभे राहिले जसे वेस्ट इंडीजचे प्लेयर स्लीपला उभे राहतात ना अगदी तसे.
सलीम मागे सरकलेला.
धावत येणाऱ्या सहा जणांवर हे पाच जण कोसळले.
शान्त्यादावर चालून येणाऱ्या पहिल्याला पासकीन मामाने गुप्तीच्या काठीने आडवून थांबवलं नि सपकन आडवा वार केला. शेजारी नितीनने लाथ घालुन एकाला खोपच्यात घेतलं. लट्याच्या हातातली चकाकती लंबी बघून एक मागे सरला. अजून एक आला हॉकी स्टिक घेऊन..
इथे भाई लोक पेटलेले.. आता रक्ताचा सडा सांडणार होता बस.. नो एक्सक्यूजेस.
तर लट्याच्या हातातली चकाकती लंबी बघून एक मागे सरला. अजून एक आला हॉकी स्टिक घेऊन.. तो आलेला बघून पहिल्याला धीर आला. दोघे लट्याच्या दिशेने धावले.
'हे घे तुझ्या आयला' म्हणत रक्ताळलेले डोळे वटारत लट्याने दोघांवर आपली लंबी फिरवली. उभी-आडवी फिरवलेली लंबी एकाचा हात आणि दुसऱ्याची मांडी चिरत गेली. त्यातल्या त्यात पहिल्याच्या हॉकीचा फटका लट्याच्या खांद्यावर बसला. लट्या सटपटलेला पाहून वार झेललेले मागे पळाले.
बाजूला नितीन काण्या एकाला शिगेचे रपारप फटके घालत होता.
धमासान सुरू झालेलं.
‘पावट्या नको घालू थांब गांडू' उस्मानला तुडवल्यावर चॉपर दोन हातांनी पेलुन पडलेल्या उस्मानच्या छातीत आरपार घुसवण्याच्या तयारीत असलेल्या पावट्यांकडे शांत्यादाने पाहिलं नि तो किंचाळला.
त्याच बरोबर लट्या आणि नितीनने पावट्याला पकडलं अन् आवरलं 'ये सोड गान्डो हा गेलाच आता... भाय को उठाने की बात कर्रेला था... भेंचो अड्डे मे घुसनेकी हिम्मत कैसे हुई.. ' पावट्याच्या डोक्यात खून सवार झालेला.
‘भाग भेन्चोद’ म्हणत उस्मानला शांत्यादाने लाथ हाणली.
उस्मान जिवाच्या आकांताने उठला नि जीपच्या दिशेने धावला तेवढ्यात मघाशी सलीमने पायाने उडवलेले जेवणाचे ताट उस्मानच्या डोक्यात पडले.. आक्काचा निशाणा खतरा बसलेला.
सगळ्यात आधी सलीम जीपकडे धावलेला. काहीतरी शोधत होता तो... घोडा... घोडा शोधत होता... त्यालाही माहित होतं की त्याने घोडा नाही आणलाय... तरी पण शोधत होता... भेटलाच तर ह्यांच्यावर फायर करायला. पण सलीमला एवढ्यातच कळालेलं की अड्डेवाले घोडागाडीने ऐकणारे नाहीत.
सलीमने जीप स्टार्ट केली. हॉर्न देत संडासाकडून खतरा यु टर्न मारला. रक्तबंबाळ अवस्थेत त्याचे साथीदार आडवेतिडवे जीपमध्ये कोंबलेले. जाताना खानकन चार-पाच दगडांचा मारा झाला त्याच्यावर... सुसाट जीप हाकत सलीमनं चाळीतलं कोण मरेल की कोण जगेल ह्याची तमा न बाळगता जीप वेगाने, खुनशीत दामटवली.
धाड धाड सगळे धपाधप पॅव्हिलियनमध्ये जमले... ...
घामाने लथपथलेले हे भाई सगळ्यांना शांत व्हायला सांगत होते... तीस चाळीस जणांचा जमाव जमला.
बायका पण आल्या. 'ये तुम लोक कायकू आये... चलो कल्टी मारो..' पावट्या गरजला.
लट्याच्या खांद्याला दुखापत झालेली.
'आय्यो' म्हणत लट्याची बायको त्याच्या सुजलेल्या खांद्याकडे बघत विव्हळली
'अरे छोड ना' लट्याने तिचा हात झिडकारला 'काण्या चपटी काढ' म्हणताच नितीनने आणलेली कच्ची क्वार्टर त्याने घशात कोंबली. 'ले मार' म्हणत पावट्याला दिली, पावट्याने घोट रिचवला.
‘आयेंगे अभी.. वापीस आयेंगे... तयार रहा' पायरीवर सामान बाजूला ठेवून बसलेल्या शान्त्यादाच्या ह्या वाक्यावर सगळे पुन्हा शुद्धीवर आले.
भर टळटळीत उन्हातली दुपार. चाळीत सन्नाटा... प्रत्येकाने आपल्या मुलाबाळांना घरात घेऊन घराचे दार गच्च बंद करून घेतलेले.
‘आता येतील ते गँग घेऊन येतील... इथं आता कुणीच थांबू नका.' तांब्यातलं पाणी संपवत श्यान्त्यादादा म्हणाला. 'आपण पण नाय थांबायचं... गच्चीवर कडदोडीत, कौलावर फिल्डिंग लावा... त्यांना आपण नाय दिसलो तर घरांवर हल्ला करतील. आपल्याला आता जबाब द्यावाच लागेल. नाय तर कुणावर पण वार करतील ते.... बायकांना पयलं भागवा... टाईम नाय... बावा जल्दी कर नै तो धोका होयंगा.' शान्त्यादा पोटतिडकीने सांगत होता.
‘ये चला आपापल्या घरी... जे होईल ते बघू... पंगा घेतलाच हाय तर निभाऊ या’ दुर्पत आय कडाडली.
झप्पकन पांगापांग झाली. तीस-चाळीस जणांनी आपापल्या जागा घेतल्या. रस्त्यावर स्मशान शांतता...
थोड्याच वेळात..
झुप्पकन एक मोठा टेम्पो बेकरीकडून वळसा घेऊन आत शिरला. विहाराजवळ दहावी गल्लीकडे तोंड करून उभा राहिला. म्हणजे पळायला सोपं जावं म्हणून
'गांडू पुरा पिलान करके आयेले है' चुईंगम चावत कौलावरून मजा बघत असलेला येडा जावेद बडबडला.
तेवढ्यात चाळीच्या दुसऱ्या टोकाकडून अजून एक टेम्पो आत घुसला. त्याच्या मागोमाग चिकना सलीमची जीप.
लंबी, चॉपर, सळई, बांबू घेऊन पोरं उतरली. एकाने टेम्पोमधून सोडा बाटल्यांचे बॉक्स उतरवले.
‘आयच्या गावात’ चिनूची फाटली हे सगळं बघताना. फेफ्टी त्याच्या बाजूला होता तो हसला.
दुसऱ्या टोकाकडून पण हीच हालचाल. मधल्या गल्लीत अजून बारापंधराचा जमाव येताना दिसला. तिन्ही बाजूंनी त्यांनी एन्ट्री घेतलेली.
‘पन्नास जण असतील' श्यान्त्यादा
कौलावर बसलेला पासकीन मामा हसला 'बस एवढेच मग लपायचे कशाला, चल भिडूया' रक्ताळलेली गुप्ती उचलीत मामा म्हणतोय.
'थांब ना तुला कसली एवढी घाय हाय?' लट्या त्याला बसवत म्हणाला.
'अरे भेंचोत पत्ते खेळायचेत' पासकीन मामा.
शान्त्यादाने डोक्याला हात लावला.
ताड ताड बाटल्यांचा आवाज झाला. अख्खी गँग जिमखान्याच्या दिशेला झेपावली..
जिमखाना सामसूम, चाळीत सन्नाटा.
‘आ जाव गांडू किधर छुपे हो?' हातात घोडा घेऊन सलीम किंचाळला. त्याचा आवाज दुपारच्या कडक उन्हातल्या कडदोडीतला थरथरता मृगजळ छेदून पोरांच्या कानी पडला.
किंचित शांतता.
सटकन एक दगड सलीमच्या मानेवर पडला. हडबडलेल्या सलीमने दगडाच्या दिशेला गोळी झाडली. फेफ्टीने खाली वाकत तिला जाऊ दिलं. इतक्यात मागच्या बाजूने सलीमवर दगडांचा वर्षाव व्हायला सुरुवात झाली. आता सगळेच हडबडलेले मुनुरवार वाडीतून दगड येऊ लागले. सलीम गँगला कळेना काय होतंय. वरून मारा होत होता. काहीच वाकडं करू शकत नव्हते ते. मारा करणारे दिसतही नव्हते.
सटासट दगडं, कौलं पडत होती. त्यातल्या चिंधी चोरांनी हे बघून लगेच कल्टी मारली. बाकीच्यांना बाटली, ट्यूबलाईट कुठे फेकून मारावी कळत नव्हतं. पळापळ चाललेली. कुणाच्या डोक्यात, कुणाच्या पाठीत, कुणाच्या पायावर कौलांचा नि दगडांचा मारा होत होता. सलीम आणि त्याच्या फौजेची पळापळ सुरू झाली. बघता बघता तेवढा एरिया सामसुम झाला.
समोरचे पळताना नितीन काण्या खाली उतरला चकाकती लंबी घेऊन. गांडूला लय खाज.
'ये हा बघ...' समोरून बाटली फेकण्याच्या तयारीत असलेला आऱ्या गोंधळला
नितीन काण्या वेगळं रसायन होतं. येड्या डोक्याचा. साल्याला छुपं लढणं आवडायचं नाय.
लट्याची लंबी उचलली त्याने अन उतरला गांडू मैदानात भेटेल त्याच्यावर वार करत सुटला
‘मा कि आंख... ये काण्या क्यू उतरा यार' श्यान्त्यादाने डोळे विस्फारले.
नितीन काण्या उतरलेला बघून मागे सरलेल्या जमावात उभा असलेला सलीम किंचाळला ‘खतम कर गांडू को.'
धाड धाड काण्यावर बाटल्यांचा वर्षाव होऊ लागला. काण्याने पांड्याबाबाच्या बाकड्याचा आसरा घेतला. दहा-बारा जण त्याच्या दिशेने धावत येत असलेले वरच्यांना दिसले. श्यान्त्यादा हडबडला. त्याने बाजूला पडलेली तलवार उचलली. तो कौलांवरून मागे कडदोडीच्या छपरांवर झेपावला. त्याच्या मागून पाच-सहा जणांनी पण तेच केले. सगळ्यांनी आपापल्या हत्यारांसकट धाव घेतली. काही करून नितीन काण्याला वाचवायला हवे होते; नायतर त्याचा गेम ठरलेला.
संडासावरून श्यान्त्यादाने नंगीसकट रस्त्यावर झेप घेतली. त्वेषाने तो येणाऱ्या जमावाच्या दिशेने धावत सुटला. त्याच्या हातातली तळपती तलवार आणि त्याचा अवतार बघून समोरचे टरकले. त्यांनी बाटल्यांचा आणि दगडांचा मारा चालू ठेवला.
हे लोक पण त्यांचेच दगड त्यांच्यावर फेकू लागले. दादाला त्याची तमा नव्हती. त्याला काण्याला तिथून काढायचं होतं बस..
काण्यावर भयानक दगड-बाटल्यांचा मार पडलेला. रक्ताळलेल्या अवस्थेत डोकं पकडून बसलेला भोसडीचा पिंपाच्या आडोश्याला.
मागून लट्या, पासकीन मामा, पावट्या, पापलेट, अरुण, फेफ्टी, सुन्या, चंग्या सगळे धावत होते.
लट्याची नजर बाजूच्या बाकड्याला लटकलेल्या काशीराम अण्णाच्या लाकडी खटीयावर पडली. लट्याने झटक्यात खाट उचलली.
खाटेची ढाल झालेली आता. खटीयाच्या मागे सगळे जण आले. आता कसली भीती नव्हती. लट्याच्या मजबूत हाताने खटीया पेलून ठेवली होती. त्याच त्वेषात हे सगळे पुढे घुसले अगदी नितीन काण्याला क्रॉस करून गेले. झटक्यात सुन्याने नितीनला ओढत बाहेर काढलं. तो पण उठला. दोन शिव्या देत सुन्याने काण्याला संडासला लागलेल्या शिडीवरून कौलावर घुसवलं.
काण्या वाचला.
पण आता खरा लोच्या होता.
हे लोक भिडलेले तर खरे आणि ह्यांचा रुद्रावतार बघून समोरचे जरासे मागे हटलेले. पण सलीमकडे पिस्तुल होतं हे ह्या लोकांच्या लक्षात होतं की नाही कोण जाणे.
खाटेचा आधार घेऊन हे लोक भिडत होते. ह्यांना उतरलेलं बघून कौलावर, गच्चीवर लपलेल्या बाकीच्यांनी पण खाली धाव घेतली. रिकाम्या सोडाबॉटल, क्वार्टर. खंबे असलेल्या चार-पाच गोण्या मागून आल्या. आता रसद भरपूर होती. समोरचे हळूहळू मागे हटू लागले तसे लट्याने खटीया बाजूला टाकून पावट्याच्या हातातली तलवार खेचून समोरच्यांवर धाव घेतली. जीवाच्या आकांताने समोरचे मागे फिरले. इतक्यात.... इतक्यात सलीमची जीप नव्या दमाच्या साथीदारांसह गर्रकन फुल स्पीडमध्ये चाळीत शिरली. त्याने झाडलेल्या तीन-चार गोळ्या लट्या, फेफ्टी आणि शान्त्यादाचा वेध घेता घेता राहिल्या. निशाणा चुकलेला सलीमचा.
सुदैवाने त्या कुणालाच लागल्या नाहीत. लंबु म्हाद्याच्या मोठ्या पाण्याच्या पिंपातून त्या आरपार गेल्या आणि पाण्याच्या चिळकांड्या उडाल्या. आता मात्र ह्यांची फाटली.
सलीमची जीप कच्चकन ब्रेक मारत शान्त्यादाच्या बाजूला उभी राहिली. खरंतर दादाला उडवणारच होती जीप पण त्याने प्रसंगावधान राखून बाजूच्या बाकड्यावर झेप घेतली. आता सलीम आणि दादा समोरासमोर होते.
रस्त्यात काचा दगडांचा खच, रक्त सांडलंय.
सलीमने घोडा हातात घेतलेला. ट्रिगरवर त्याचं बोट अन् निशाना शान्त्यादाच्या छातीचा.
दगड-बाटल्यांचा मारा बंद झालेला. सेकंदात जीवन-मरणाचं शाश्वत सत्य कळणार होतं.
साक्षात शान्त्यादादा निशाण्यावर आलेला बघून सलीम विकृत हसला. त्याचे डोळे रक्ताळले.
डायलॉग बाजीच्या फंदात न पडता तो ट्रिगल दाबणार इतक्यात... गच्चीवरून एक सुसाट दगड सलीमच्या हाताचा वेध घेऊन गेला. त्याच्या हातून पिस्तुल निसटली. निसटलेली पिस्तुल घ्यायला सलीम वाकला. त्याच्यावर धडाधड दगडांचा, कौलांचा, बाटल्यांचा वर्षाव होऊ लागला.
पिस्तुल शान्त्यादा आणि सलीमच्या मध्ये पडलेलं. दोघांनाही ते उचलता येईना. कारण दोन्हीं पाटर्यांकडून एकमेकांवर दगड, बाटल्यांचा मारा होत होता. इतक्यात लट्याने बाजूच्या पिम्पावरचे मोठे लोखंडाचे झाकण उचलले. त्याची ढाल करत त्याने धावत जाऊन शान्त्यादाला कव्हर केलं.
रस्त्यावर काचा-दगडांचा ढीग पडलेला. चाळीच्या मधोमध सलीमची जीप उभी. जीपमध्ये जायबंदी झालेले, रक्ताळलेल्या अवस्थेत वरून येणाऱ्या कौलांचा मारा सोशीत डोकं खाली घालून त्यावर दोन्ही हात ठेवून सीटखाली जीव वाचविण्याच्या प्रयत्नात असलेले सलीम आणि त्याचे चार-पाच साथीदार.
घोडा खाली पडल्यामुळे त्याला मिळवण्याखेरीज गत्यंतर नसल्यामुळे जीप स्टार्ट करून पळून जाण्यात हतबल झालेला सलीम. त्याच्या जीपचा आडोसा घेऊन मिळेल त्या वस्तूने शांत्या आणि कंपनीवर काऊंटर अॅटॅक करणारे सलीमचे सात-आठ बंदे.
‘भाय गाडी स्टार्ट करो.. कुचल दो हरामीको' समोरून धावत येणाऱ्या दोघांना बघून रज्जाक ओरडला.
सलीमने भानावर येत गाडीला चावी दिली. फर्स्ट गीअरमध्ये साठच्या स्पीड वर जीपचा एक्सलरेटर दाबून सलीमने धावत येणाऱ्या लट्या आणि श्यान्त्यावर जीप सोडली.
खूपच कमी अंतर होतं जीप नि ह्या दोघांच्यात.
जीप जीवघेण्या वेगाने दोघांच्या अंगावर येत होती.
प्रचंड वेगाने येणाऱ्या जीपचा कानोसा घेऊन प्रसंगावधान राखून दोघे भिंतीकडच्या पिंपळाकडे वळले. त्यांना चिरडण्यासाठी सलीमने क्षणात जीप त्यांच्याकडे वळवली. येणाऱ्या गाडीचा रोख पाहून हातातलं झाकण गाडीवर भिरकावत दोघांनीही एकमेकांच्या विरुद्ध बाजूला झेप घेतली. लोखंडी झाकण गाडीच्या काचेवर जाऊन आदळलं. सलीमचा गाडी वरचा ताबा सुटून गाडी धाडदिशी समोरच्या भिंतीवर आदळली. सलीम स्टेरिंग व्हील वर भयानक आदळला. गाडी चेपलेली. सलीम आणि त्याचे बंदे गाडीत निपचित पडलेले.
इतक्यात मोठ्ठा भोंगा वाजला, फुर्र फुर्र शिट्ट्या वाजू लागल्या आणि मोठ्ठा निळा डब्बा प्रचंड वेगाने चाळीत घुसला.
'लट्या नको उचलू...आपल्यावर खपेल तो' बाजूला पडलेल्या श्यान्त्यादाने स्वतःला सावरत उठताना पाहिलं की लट्या, सलीमची मघाशी पडलेली पिस्तुल उचलण्याच्या प्रयत्नात आहे अन् तेवढ्यात तो जीवाच्या आकांताने ओरडला
'कल्टी मारा ... डब्बा आलाय' म्हणताच पिस्तुलाला हात लावायला जाणारा लट्याचा हात तिथंच थांबला. त्याने आजूबाजूला पाहिलं. पोलीस वेगाने येत होते. चेहरेपट्टी होण्याच्या आधी सामान तिथंच सोडत त्याने छपरावरून कौलावर, पुरा कौलावरून कडदोडीत पलक झपकताच उडी घेतली.
बेकरीच्या गच्चीत श्यान्त्यादाने त्याला हात देत वर खेचल.
कडदोडीवरून हलक्या पावलाने उड्या घेत हे सगळे बेकरीच्या छुप्या अड्यावर एक एक करून जमा झाले.
*✍️ सुधीर जाधव*
💠 पुढे क्रमशा क्रमश..... प्रकरण ११कामाठीपुरा : प्रकरण 1️⃣0️⃣
अकलूज वैभव न्यूज नेटवर्क

कडदोडीवरून हलक्या पावलाने उड्या घेत हे सगळे बेकरीपच्या छुप्या अड्यावर एक एक करून जमा झाले.
*✍️ सुधीर जाधव*
💠 पुढे क्रमशा क्रमश..... प्रकरण ११

0 टिप्पण्या