✍️ Shortcuts च्या दुनियेत हरवला निवांतपणा
वृत्त एकसत्ता न्यूज
संकलक : आकाश भाग्यवंत नायकुडे
अकलूज दिनांक 06/07/ 2026 :
बदल हा काळाचा नियम असला, तरी आजच्या 'Shortcut' संस्कृतीने आपल्याला कुठेतरी थांबून विचार करायला भाग पाडलं आहे. जिथे नात्यांमध्ये संवाद सुकर व्हावा म्हणून मोबाईल आला, तिथे आज संवादाची जागा 'Chatting'ने आणि भावनांची जागा निर्जीव 'Emoji'ने घेतली आहे! हीच 'inatant' वृत्ती आपल्या ताटातही शिरली आहे. जेवणातल्या तृप्तीची जागा आता 'Instant Noodles' किंवा 'Redy to eat' च्या पाकिटांनी घेतली आहे. भूक नक्कीच शमते, पण ती तृप्ती मिळत नाही.
या वेगाच्या नादात आपण जगण्यातला निवांतपणा आणि नात्यांमधली खरी गोडी तर हरवून बसत नाही ना?
सकाळी उठल्या उठल्या मोबाईलवर 'GM' किंवा 'GN' सारखे दोन अक्षरी Codewords पाठवून आपण नाती टिकवण्याचा आभास निर्माण करतोय. पण विचार करा, त्या यांत्रिक मेसेजपेक्षा समोरच्याच्या डोळ्यात डोळे घालून, चेहऱ्यावर एक छोटंसं हसू आणून दिलेली 'शुभ प्रभात'ची प्रत्यक्ष हाक कितीतरी पटीने जास्त ऊर्जा देऊन जाते! दोन मिनिटं काढून कोणाची तरी विचारलेली खुशाली, समोर बसून घेतलेला चहाचा घोट आणि प्रेमाने भरवलेला तो दोन घासांचा घास... यात जी 'instant Positivity' आणि जिवंतपणा आहे, ती या जगातल्या कोणत्याही coding मध्ये किंवा Digital language मध्ये असूच शकत नाही.
तंत्रज्ञानाने जग जवळ आलं खरं, पण माणसं दुरावली. Screen वरच्या आभासी 'Likes 'पेक्षा प्रत्यक्ष भेटीतली ती मायेची थाप अधिक महत्त्वाची आहे. यंत्रांच्या या गर्दीत आपण स्वतःमधलं माणूसपण आणि नात्यांचा ओलावा जिवंत ठेवायला हवा.
शेवटी, आयुष्य हे Screen वर 'Scroll' करून संपवायचं नसून, माणसांमध्ये राहून मनापासून 'जगायाचं' असतं. तंत्रज्ञानाला सुविधेपुरतं मर्यादित ठेवूया; त्याला आपल्या भावनांवर ताबा मिळवू देऊ नका. या धावपळीत थोडं थांबूया, निवांत जगूया आणि नात्यांची ती जुनी, खरी गोडी पुन्हा चाखूया. काय, पटतंय ना?
©️ShradDhanesh's Dairies
संकलन : प्रविण सरवदे, कराड,
0 टिप्पण्या