वाळेकर 卐 पराडे - पाटील शुभविवाह सोहळा संपन्न

वाळेकर 卐 पराडे - पाटील शुभविवाह सोहळा संपन्न

वृत्त एकसत्ता न्यूज 

आकाश भाग्यवंत नायकुडे 

अकलूज दिनांक 04/07/2026 :

कै. चांगदेव सुखदेव वाळेकर यांची नात व सौ. मनिषा व श्री नवनाथ चांगदेव वाळेकर राहणार पिंपरी बुद्रुक, तालुका इंदापूर, जिल्हा पुणे यांची सुकन्या चि.सौ.कां. वृषाली आणि श्री दत्तात्रय आबाजी पराडे- पाटील यांचे नातू व सौ. वैशाली व डॉ. श्री हनुमंत दत्तात्रय पराडे- पाटील (सहाय्यक आयुक्त, पशुसंवर्धन व दुग्ध व्यवसाय, धाराशिव) रा. बाभुळगाव तालुका माळशिरस, जिल्हा सोलापूर यांचे ज्येष्ठ चिरंजीव निखिल यांचा शुभविवाह शनिवार दिनांक 04/07/2026 रोजी दुपारी 12 वा. 31 मि. या मुहूर्तावर थाटाने संपन्न झाला.

सौभाग्य मंगल कार्यालय, माळीनगर पेट्रोल पंपा समोर माळीनगर, तालुका माळशिरस, जिल्हा सोलापूर येथे संपन्न झालेल्या या शुभविवाह सोहळ्याप्रसंगी सर्व क्षेत्रातील, सर्व स्तरातील मान्यवरांनी उपस्थित राहून नव वधू-वराना शुभाशिर्वाद दिले. याप्रसंगी भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे माळशिरस तालुका अध्यक्ष गिरीश प्रभाकर शेटे, अकलूज वैभव आणि वृत्त एकसत्ताचे संस्थापक संपादक भाग्यवंत लक्ष्मण नायकुडे हे देखील उपस्थित होते.

याप्रसंगी उपस्थित असणाऱ्या सर्वांचे वाळेकर आणि पराडे - पाटील परिवाराच्या वतीने स्वागत सन्मान करण्यात आला.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या