सहकार महर्षी अभियांत्रिकी महाविद्यालयामध्ये अभियांत्रिकी पदवी प्रवेश प्रक्रिया सुविधा केंद्राचे उद्घाटन संपन्न

 


सहकार महर्षी अभियांत्रिकी महाविद्यालयामध्ये अभियांत्रिकी पदवी प्रवेश प्रक्रिया सुविधा केंद्राचे उद्घाटन संपन्न 

वृत्त एकसत्ता न्यूज 

आकाश भाग्यवंत नायकुडे 

अकलूज दिनांक 04/07/2026 :

शंकरनगर अकलूज येथील सहकार महर्षि शंकराव मोहिते पाटील इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अँड रिसर्च या अभियांत्रिकी महाविद्यालयांमध्ये पदवी इंजिनिअरिंग (एफ सी ६७८२) २०२६- २७ वर्षाकरिता  प्रवेश प्रक्रिया सुविधा केंद्राचे उद्घाटन रवींद्र सुभाष पवार  या पालकांच्या हस्ते संपन्न झाल्याची माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. प्रवीण ढवळे यांनी दिली.

दिनांक २ जुलै २०२६ पासून सदर प्रवेश प्रक्रिया नोंदणी सुरू झालेली आहे. या सुविधा केंद्रामध्ये प्रथम वर्ष अभियांत्रिकी पदवी प्रवेश प्रक्रिया अर्जाची नोंदणी व अर्ज निश्चिती करता येणार आहे. सुविधा केंद्र सकाळी ९:३० ते सायंकाळी ५:०० वाजेपर्यंत चालू  असणार आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थी व पालकांना पदवी इंजीनियरिंग अभ्यासक्रमाच्या प्रवेश प्रक्रियेची गैरसोय होऊ नये या हेतूने महाविद्यालयाचे अध्यक्ष  जयसिंह शंकरराव मोहिते पाटील व महाविद्यालयीन विकास समितीच्या अध्यक्षा कु. स्वरूपाराणी जयसिंह मोहिते पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पदवी इंजीनियरिंग प्रवेश प्रक्रिया सुविधा केंद्रामध्ये मोफत सोय देण्यात येणार आहे .पालकांनी व विद्यार्थ्यांनी सदर सुविधांचा लाभ घ्यावा असे आवाहन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. प्रवीण ढवळे यांनी केले आहे. 

सदर उद्घाटन प्रसंगी विद्यार्थी, पालक, संस्थेतील शिक्षक व शिक्षकेत्तर सेवक उपस्थित होते. प्रवेश प्रक्रिया केंद्राचे व्यवस्थापन प्रा. गौरव गिरीधर देशपांडे व प्रा. वैभव शशिकांत रिसवडकर हे पाहत आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या