वृत्त एकसत्ता न्यूज
संकलक : आकाश भाग्यवंत नायकुडे
अकलूज दिनांक 05/07/2026 :
भरलेले घर आणि सुंदर मन हे फक्त समाधानी व्यक्तीचेच असते. कारण ती व्यक्ती स्वत:कडे जे काही आहे त्यात खुश असते आणि इतरांच वाईट व्हावे हा विचार कधीच करत नाही.
वाट सर्वांना माहीत असते, पण ध्येय गाठण्याची जिद्द फार कमी जणात असते.
रागात बोललेला एक शब्द एवढा विषारी असतो की प्रेमात बोललेल्या हजारो गोष्टींना एक क्षणात संपवुन टाकतो.
वादळ निसर्गाचं असो किंवा मनाचे ते धडकणारचं,
स्वार्थ, अहंकार, मान-अपमान आणि मोठेपणा सोडला की आनंद घेता येतो आणि देताही येतो. अपेक्षा, गैरसमज, बदला, राग-रुसवा, अहंकार यामुळे एकमेकातील नाती बिघडतात. असे होऊ नये म्हणून, सर्व विसरा अन् माफ करा, हे तत्त्व केव्हाही आपल्यासाठी, समाजासाठी आणि धार्मिक सेवेसाठी चांगल.
ग्रंथ समजल्याशिवाय संत समजणार नाही. आणि संत समजल्याशिवाय भगवंत समजणार नाही,
जे बोलण्यात पटाईत लोकं असतात ते नेहमी खऱ्याला खोटं आणि खोट्याला खरं ठरवत असतात.
तो त्यांचा नित्यनियमित उद्योग असतो, पण कालांतराने त्यांचे पितळ उघडे पडते व सत्य जगासमोर येते.
सर्वांच्या लक्षात आल्यानंतर त्यांच्या बोलण्याकडे निरर्थक बडबड, वायफळ बोलणे म्हणून पाहिले जाते आणि दुर्लक्षित केले जाते.
माणसाच्या शब्दाला वजन पाहिजे, लोकांनी शब्द म्हणजे प्रमाण म्हणून मानलं पाहिजे,
या जीवनात कधी कुणाचा काळ असतो, तर कधी कुणाची वेळ असते. आज वाऱ्याने उडणारा कोरडा पालापाचोळा तर कधी कालची नयनरम्य निसर्गाची पांघरलेली हिरवळ असते. जेथे निर्मिती आहे. याचे निर्माल्य सुद्धा ठरलेले असते. म्हणून आयुष्यातील प्रत्येक क्षणाचा आनंद घ्यायला शिका. जीवन हे क्षणभंगुर आहे, त्याला आनंदी बनवा,
इंद्रधनुष्य आणि माणूस या दोघांमध्ये एक साम्य आहे ते म्हणजे या दोघांत विविध प्रकारचे रंग असतात.
फरक एवढाच की इंद्रधनुष्याचे रंग डोळ्याने दिसतात. आणि माणसाचे रंग अनुभवातून कळतात.
देवाकडे काही मागायचे असेल तर नेहमी आईचे स्वप्न पूर्ण व्हावे हा आशीर्वाद मागा. तुम्हाला कधी स्वत:साठी काही मागयची गरज पडणार नाही,
प्रा. एस. एम. पाटील
देवगाव, तालुका-पारोळा (जळगाव)
प्रविण सरवदे, कराड

0 टिप्पण्या