मनाची शुद्धता


 मनाची शुद्धता

🇮🇳कारगील विजय दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!🇮🇳 

वृत्त एकसत्ता न्यूज

संकलक : आकाश भाग्यवंत नायकुडे

अकलूज दिनांक 26/7/2026 :

भारत-पाकिस्तान यांच्यात १९९९ मध्ये कारगील येथे युद्ध झाले व ते भारताने जिंकले, हे सर्वश्रुत आहे. हिमालयाच्या उंच शिखरांवरील आपल्या चौक्या ताब्यात घेऊन तेथून गोळीबार करणाऱ्या शत्रूच्या सैन्याला पाणी पाजणे सोपे नव्हते.

'शर्थीचे प्रयत्न' म्हणजे काय, हे आपल्या भारतीय जवानांनी दाखवून दिले. बर्फाळ प्रदेशात, उणे तापमानात खालून वर युद्धसामग्रीसह चढून जाणे, शत्रूच्या हल्ल्याला चोख उत्तर देणे आणि सर्व चौक्या परत ताब्यात घेणे हे शिवधनुष्य त्यांनी यशस्वीपणे पेलले.

अर्थात, यासाठी अनेकांनी हौतात्म्य पत्करले; तर अनेक जण कायमस्वरूपी जखमी झाले. भारतमातेच्या रक्षणासाठी त्यांनी केलेला हा त्याग, त्यांचे धैर्य आणि शौर्य अतुलनीय आहे.

आजचा संकल्प

भारतीय जवान हे देशरक्षणासाठी सीमेवर नेहमीच आघाडीवर असतात. आपण देशात राहून त्यांच्या कुटुंबीयांची जबाबदारी घेऊ, त्यांना भक्कम आधार देऊ व आपले नागरिक म्हणून असलेले कर्तव्य पूर्ण करू.

सौ. स्नेहलता स. जगताप.

====================

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या