जबाबदाऱ्या

 जबाबदाऱ्या

वृत्त एकसत्ता न्यूज

संकलक : आकाश भाग्यवंत नायकुडे

अकलूज दिनांक 25/7/2026 :

असं अनेकदा होतं, किंबहुना रोजचंच असतं. काही जबाबदाऱ्या आपल्याला आवडत नाहीत. कधी त्या आपल्या आवडीच्या असल्या तरी त्या पार पाडण्यासाठी मन तयार नसतं. तरीही त्या पार पाडाव्याच लागतात.

मग अशा जबाबदाऱ्यांचा बाऊ करत बसण्यापेक्षा त्या स्वीकारून, कर्तव्य म्हणून मनापासून पार पाडल्या तर त्यांचा त्रास कमी होतो. त्यातून काम पूर्ण झाल्याचं समाधानही मिळतं.

पण न आवडणाऱ्या जबाबदाऱ्या कुरकुर करत किंवा विरोध करत पार पाडल्या, तर त्याचा त्रास इतरांना तर होतोच; पण त्याहून अधिक त्रास आपल्या स्वतःच्या मनालाच होतो.

म्हणून मी एवढंच म्हणेन—जरी एखादी जबाबदारी आवडत नसेल, ती करावीशी वाटत नसेल, तरी थोडा विचार करून, ती मनापासून स्वीकारून पार पाडली तर ती ओझं न वाटता आपल्या कर्तव्यपूर्तीचं समाधान देऊन जाते.

जबाबदाऱ्या टाळून मनाला शांतता मिळत नाही; त्या स्वीकारून पार पाडल्या की समाधान नक्की मिळतं.


र✍️©️ सौ. धनश्री म्हेत्रस

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या