सहकार महर्षि अभियांत्रिकी महाविद्यालयामध्ये राजमाता रत्नप्रभादेवी शंकरराव मोहिते-पाटील यांची जयंती संपन्न

 


सहकार महर्षि अभियांत्रिकी महाविद्यालयामध्ये  राजमाता रत्नप्रभादेवी  शंकरराव  मोहिते-पाटील  यांची जयंती संपन्न 

वृत्त एकसत्ता न्यूज

आकाश भाग्यवंत नायकुडे

अकलूज दिनांक 25/7/2026 :

अकलूज येथील सहकार महर्षी शंकरराव मोहिते-पाटील इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अँड रिसर्च, शंकरनगर अकलूज अभियांत्रिकी महाविद्यालयामध्ये राजमाता कै.रत्नप्रभादेवी शंकरराव मोहिते-पाटील यांची  जयंती उत्साहात साजरी करण्यात आल्याची माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. प्रवीण ढवळे यांनी दिली.

 प्राचार्यांच्या हस्ते राजमाता रत्नप्रभादेवी  शंकरराव  मोहिते-पाटील  यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. त्यानंतर  महाविद्यालयाच्या पदविका विभागातील वरिष्ठ लिपिक  मिनाक्षी राऊत  यांनी रत्नप्रभादेवी  शंकरराव  मोहिते-पाटील यांच्या जीवनकार्याचा आढावा घेतला.

त्यानंतर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. प्रवीण ढवळे यांनी राजमाता रत्नप्रभादेवी  शंकरराव  मोहिते-पाटील यांच्या कार्याची माहिती दिली आणि अकलूज सारख्या परिसराचे नंदनवन व सर्व शैक्षणिक सुविधा निर्माण करण्यास त्यांनी जे योगदान दिले ते अविस्मरणीय आहे असे सांगितले. 

याप्रसंगी महाविद्यालयाचे समन्वयक, कार्यालयीन अधीक्षक, सर्व विभागाचे विभागप्रमुख, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रस्ताविक प्रा. भारती चंदनकर यांनी केले. सदर कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी सर्व विभागाचे विभाग प्रमुख, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी काम पाहीले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या