विचारधारा

 


विचारधारा 

वृत्त एकसत्ता न्यूज 

आकाश भाग्यवंत नायकुडे

अकलूज दिनांक 11/7/2026 :

जीवनात आपल्याला यश मिळते तसे अपयश पण येते. प्रयत्न तर चालूच असतात. जिद्दीने, चिकाटीने प्रयत्न केले जातात, तरीपण क्वचित जे हवे ते नाही मिळत.

अशा वेळेस निराश न होता आपण थोडे आत्मनिरीक्षण करायचे. आपले काही चुकते आहे का? आपण चुकीच्या दिशेने जातोय का? थोडा बदल केला पाहिजे का? असे स्वतःलाच प्रश्न विचारायचे.

मुलांनो, कधी कधी आपल्याकडूनच काही गफलत होत असते. चूक लक्षात येणे व ती सुधारणे हे फार महत्त्वाचे असते. त्यामुळे आपल्या अपेक्षेप्रमाणे यश मिळाले नसले, तरी अनुभव मिळालेला असतो, जो पुढील वाटचालीसाठी महत्त्वाचा असतो.

योग्य दिशेने, योग्य वेळेस केलेले प्रयत्न आपल्याला यशस्वी बनवतात.

सौ. स्नेहलता स. जगताप.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या