अधिकार

 


अधिकार

वृत्त एकसत्ता न्यूज 

संकलक : आकाश भाग्यवंत नायकुडे 

अकलूज दिनांक 06/07/ 2026 :

इथे कशावरच नाही

अधिकार कुणाचा;

गुलाम असतो माणूस

इथे फक्त नियतीचा. ॥१॥


विधिलिखित कुणी

नाही बदलू शकत;

जे घडायचे ते घडते,

ईश्वराचीच ती ताकद. ॥२॥


म्हणून म्हणते मी,

नतमस्तक नित्य असावे;

भगवंताच्या चरणी

रामनाम नित्य जपावे. ॥३॥


हात जोडावे देवापुढे,

सुखाचे दान मागावे;

जे आहे ते स्वीकारून,

मनी प्रेमभाव जपावे. ॥४॥

✍️©️सौ.धनश्री म्हेत्रस 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या