नायकुडे 卐 वाघमोडे शुभ विवाह सोहळा संपन्न
वृत्त एकसत्ता न्यूज
आकाश भाग्यवंत नायकुडे
अकलूज दिनांक 09/07/2026 :
श्री तुकाराम मल्हारी नायकुडे यांची नात व सौ.चंद्रकला व श्री शंकर तुकाराम नायकुडे रा. नायकुडे वस्ती, मायाक्का कॉलनी, संग्रामनगर - अकलूज, तालुका माळशिरस, जिल्हा सोलापूर यांची ज्येष्ठ कन्या चि.सौ.कां. हर्षदा आणि कै. शंकर सिताराम वाघमोडे यांचे नातू व सुवर्णा व श्री दत्तात्रय शंकर वाघमोडे राहणार कात्रज, तालुका करमाळा, जिल्हा सोलापूर यांचे चिरंजीव प्रशांत यांचा शुभविवाह गुरुवार दिनांक 09/07/2026 रोजी दुपारी 12 वा.39 मि. या शुभ मुहूर्तावर अत्यंत थाटाने संपन्न झाला.
श्री योगेश्वरी लॉन्स, भिगवण - राशीन रोड, डिकसळ, तालुका इंदापूर, जिल्हा पुणे येथे संपन्न झालेल्या या शुभविवाह सोहळ्याप्रसंगी सर्व क्षेत्रातील, सर्व स्तरातील मान्यवरांनी उपस्थित राहून नववधूवरांना शुभ आशीर्वाद दिले. याप्रसंगी भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे माळशिरस तालुका अध्यक्ष गिरीश प्रभाकर शेटे, अकलूज वैभव आणि वृत्त एकसत्ताचे संस्थापक संपादक व सेवा जेष्ठ पत्रकार भाग्यवंत लक्ष्मण नायकुडे, यशराज गिरीश शेटे हे देखील उपस्थित होते.
या शुभ विवाह सोहळ्याप्रसंगी उपस्थित असणाऱ्या सर्वांचे नायकुडे आणि वाघमोडे परिवाराच्यावतीने स्वागत, सन्मान करण्यात आला

0 टिप्पण्या