विचारधारा
वृत्त एकसत्ता न्यूज
संकलक : आकाश भाग्यवंत नायकुडे
अकलूज दिनांक 25/7/2026 :
आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा!
आषाढ शुद्ध एकादशी अर्थात देवशयनी एकादशी व पंढरपूरची वारी! महाराष्ट्रातील विविध भागांतून विविध संतांच्या पालख्या ज्येष्ठ महिन्यातील ठराविक तिथींना पंढरपूरच्या दिशेने, विठुरायाच्या दर्शनासाठी प्रस्थान करतात.
हजारो भाविकांच्या समवेत निघालेल्या पालखीसोबत अनेक दिंड्या असतात. प्रत्येक दिंडीमध्ये टाळकरी, विणेकरी, मृदंगवादक व गायक मंडळी असतात. ठराविक ठिकाणी विसावा, दुपारचे जेवण, पुन्हा विसावा व रात्रीचा मुक्काम असे सर्व ठरलेले असते.
मुलांनो, महाराष्ट्रातील या वारीला परराज्यांतून भाविक येतातच, पण परदेशांतूनसुद्धा लोक खास वारीचा अनुभव घेण्यासाठी येतात. यंदा तर लंडनहून दिंडी आली आहे. आपण अजून लहान आहोत; पण मोठे झाल्यावर आयुष्यभरात एक तरी पायी वारी नक्की करायची, बरे का!
_चला पंढरीला जाऊ, रूप विठ्ठलाचे पाहू! जय हरी विठ्ठल!_
सौ. स्नेहलता स. जगताप.

0 टिप्पण्या