विचारधारा
वृत्त एकसत्ता न्यूज
संकलक : आकाश भाग्यवंत नायकुडे
अकलूज दिनांक 12/07/ 2026 :
कृतज्ञता हा भाव नेहमीच फार महत्त्वाचा असतो. केलेल्या मदतीची किंवा उपकाराची जाणीव ठेवणे म्हणजे कृतज्ञ राहणे. त्या व्यक्तीबद्दल आपल्या मनात, बोलण्यात व वागण्यात आदर असला पाहिजे.
आपले आई-वडील, गुरुजन व वडीलधारी माणसांशी आदराने, नम्रपणे वागणे हे चांगले संस्कार समजले जातात. त्यांनी सांगितलेली छोटी-मोठी कामे विनातक्रार करता आली पाहिजेत.
मुलांनो, आपण लहानाचे मोठे होत असताना, आपण घडत असताना कित्येकांची मदत होते. ते त्यांचे श्रम, वेळ, पैसे आपल्यासाठी वापरतात. त्याबदल्यात आपले पण काही कर्तव्य असते.
इतरांसाठी आपणही काहीतरी कृतज्ञता म्हणून करणे हे आपले कर्तव्य आहे.
सौ. स्नेहलता स. जगताप.

0 टिप्पण्या