एकनाथ शिंदे यांनी परत एकदा फोडा फोडीचे विकृत काम का केलं असेल?

 


एकनाथ शिंदे यांनी परत एकदा  फोडा फोडीचे विकृत काम का केलं असेल?

वृत्त एकसत्ता न्यूज 

संकलक : भाग्यवंत लक्ष्मण नायकुडे 

अकलूज दिनांक 01/07/2026 :

एकनाथ शिंदे यांनी आता जे काही शिवसेना पक्ष फोडण्याचे विकृत काम केलंय ते फक्त लालसे पायी केलंय,आपल्याला वर वर जे दिसतंय ते जरी खरं असलं तरी पडद्यामागे वेगळेच चेहरे आहेत, आपल्याला वाटत असेल की पडद्यामागे देवेंद्र फडणवीस आहेत, पण नाही, पडद्यामागे देवेंद्र फडणवीस नसून अमित शाह आहेत, तेच संघाच्या आदेशानुसार हे सगळे मोहरे हलवत आहेत.

ते कसे ते सांगतो, भाजपा व नरेंद्र मोदी यांनी देशाच्या केलेल्या नुकसानीमुळे संपूर्ण देशात भाजपा बद्दल नकारात्मक लाट आहे, तरीही भाजपा आता ज्याकाही निवडणुका जिंकतंय ते फक्त आणि फक्त निवडणूक आयोगाच्या चुकीच्या व खोट्या कार्यपद्धतीने जिंकतंय. पश्चिम बंगाल काय, किंवा देशाच्या कोणत्याही राज्यातील यश हे भाजपचे स्वतः चे यश नाहीय, नाहीतर निवडणुकीनंतर पश्चिम बंगाल मध्ये EVM मशीन जाळण्याचे कार्य निवडणूक आयोगाला करावे लागले नसते. 

असो आपला मुद्दा आहे की, एकनाथ शिंदे यांनी परत असे का केले, ते तर आता उपमुख्यमंत्री आहेत, त्यांची सत्ता आहे, मग आता का?

का तर, काही महिन्यांपूर्वी भाजपने महिला आरक्षणाच्या नावाने परिसीमन बिल लोकसभेत आणले होते, परंतू हे बिल मंजूर करण्यासाठी असलेले 2/3 खासदार भाजपा कडे नव्हते, ते बिल अडकले, सगळ्यांना आठवत असेल की त्या वेळेस भाजपने व त्यांच्या गोबरभक्तांनी देश भर काय उच्छाद मांडला होता, की काँग्रेस महिला आरक्षणाला विरोध करतय, जे महिला आरक्षण अगोदरच मंजूर झालंय त्याचे बिल परत आणून संघ व भाजपाला त्याच्या आड परिसीमन कायदा कायदा मंजूर करायचा होता, पण त्या वेळेस विरोधी पक्षांच्या एकतेमुळे भाजपाचे हे कारस्थान उधळून लावले गेले होते. 

मग चवताळलेल्या अमित शाह व संघ परिवाराने ही नविन कुटनीती आणलीय, ज्यात विरोधी पक्षाचे खासदार साम दाम दंड भेद वापरून फोडायचे व आपला आकडा 2/3 पर्यंत न्यायचा. आता संघ व भाजपाला हे परिसीमन बिल एवढे का महत्वाचे आहे? तर मी अगोदर सांगितल्या प्रमाणे नरेंद्र मोदी या बाहुल्यानें मागील 12 वर्षात देश अधोगतीकडे नेलाय त्यामुळे संघ व भाजपाला परत निवडून येण्याची शास्वती नाहीय. मग हे परिसीमन कसे काय महत्वाचे आहे? तर या परिसीमन मुळे देशातील लोकसभेच्या जागा वाढविल्या जाणार आहेत, यात उत्तरेकडील गाय पट्ट्यातील लोकसभा जागा जास्त संख्येने वाढविल्या जात आहेत, कारण दक्षिण भारतातील सुशिक्षित राज्यात भाजपाची धर्म द्वेषाची गणिते फेल ठरत आहेत. आणि संघ व भाजपाला आशा आहे की उत्तर भारतात सुरू असलेल्या धर्म द्वेषाच्या जोरावर सहज जिंकता येईल, त्या शिवाय सोबत निवडणूक आयोग व त्यांचा विकृत कारभार आहेच. 

आता एकनाथ शिंदे ना कोणती लालसा आहे? तर एकनाथ शिंदे यांना महाराष्ट्राचे मुख्यमंत्री पद हवेय, आणि याच गाजराच्या आशेने त्यांनी हे घडवून आणलेय, नाहीतर त्यांना याची आता काहीही गरज नव्हती.

एकनाथ शिंदे हे आता संघ व अमित शाह च्या दाराबाहेर बांधलेले गुलाम झालेत, फक्त मुख्यमंत्री पदाच्या लालसेपायी त्यांनी आपल्या मालकाला खुश करण्यासाठी हे केलंय.

पण सत्य हे आहे की आता एवढ्यानेही भाजपचा आकडा 2/3 होणार नाही, तर त्यामुळे अजून देशातील इतर पक्षांचे खासदार फोडायचे कार्य सुरू राहील. त्यानंतर परत एकदा परिसीमन बिल लोकसभेत मांडले जाईल, आणि मंजूर करून घेतले जाईल. 

त्यानंतरही एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री पद मिळेल याची शास्वती नाहीय.

मित्रानो आता देशाचे संविधान तर जवळ जवळ संपूष्टात आलेलेच आहे, पण आता आपल्याला देशाला वाचवायचे असेल तर दुसऱ्यांदा स्वतंत्र लढ्यासाठी रस्त्यावर उतरल्याशिवाय पर्याय नाहीय. 

-प्रमोद शिंदे 

प्रवक्ता, सचिव मुंबई प्रदेश 

संभाजी ब्रिगेड,

9967013336

8793213736

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या