गांधी 卐 शहा शुभविवाह निमित्त आयोजित स्नेहभोजन व सदिच्छा भेट सोहळा संपन्न
वृत्त एकसत्ता न्यूज
आकाश भाग्यवंत नायकुडे
अकलूज दिनांक 27/06/2026 :
स्व. प्रद्युम्न श्रेणिक गांधी यांची नात व सौ. वर्षा आणि योगेश प्रद्युम्न गांधी यांची ज्येष्ठ कन्या चि.सौ.कां. देशना आणि चि. मनीष अमोल शहा यांच्या शुभविवाहा निमित्त आयोजित केलेला सदिच्छा भेट व स्नेहभोजन सोहळा अत्यंत थाटाने संपन्न झाला.
शनिवार दिनांक 27/6/2026 रोजी सायंकाळी कांतीलाल सांस्कृतिक भवन शंकरनगर- अकलूज येथे आयोजित कार्यक्रम प्रसंगी उपस्थित राहून नववधूवरांना भावी जीवनातील यशस्वी वाटचालीकरिता उपस्थित मान्यवरांनी हार्दिक शुभेच्छा व्यक्त केल्या. याप्रसंगी भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे माळशिरस तालुका अध्यक्ष गिरीश प्रभाकर शेटे, अकलूज वैभव आणि वृत्त एकसत्ताचे संस्थापक संपादक, सेवा जेष्ठ पत्रकार भाग्यवंत लक्ष्मण नायकुडे, यशराज गिरीश शेटे, भावीन देसाई, डॉक्टर महावीर गांधी, अमोल वैद्य इत्यादी मान्यवरांनी ही नववधूवरांना शुभेच्छा दिल्या.

0 टिप्पण्या