"रूपा मॅचिंग कॉर्पोरेशन अकलूज"च्या नूतन वास्तूतील सुसज्ज कापड दालनास सदिच्छा भेट

 


"रूपा मॅचिंग कॉर्पोरेशन अकलूज"च्या नूतन वास्तूतील सुसज्ज कापड दालनास सदिच्छा भेट

वृत्त एकसत्ता न्यूज 

आकाश भाग्यवंत नायकुडे 

अकलूज दिनांक 27/06/2026 :

तत्कालीन अकलूजच्या शिवापुर पेठेतील  शर्टिंग, सुटिंग आणि होजीयरी मध्ये सुप्रसिद्ध ठरलेल्या कापड दुकान "हिरव्या माडी" या वटवृक्षाची एक  पारंबी असलेल्या "रूपा मॅचिंग कॉर्पोरेशन"च्या नूतन वास्तू मधील व्यवसायारंभा निमित्त सदिच्छा भेट देण्याचा आनंददायक योग शनिवार दिनांक 27/6/2026 रोजी दुपारी  जुळून आला. 

भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे माळशिरस तालुकाध्यक्ष गिरीश प्रभाकर शेटे, अकलूज वैभव आणि वृत्त एकसताचे संस्थापक संपादक, सेवा जेष्ठ पत्रकार भाग्यवंत लक्ष्मण नायकुडे, यशराज गिरीश शेटे यांनी या सदिच्छा भेटीमध्ये सर्व प्रकारच्या साड्यांच्या अत्याधुनिक, फॅशनेबल, लेडीज ड्रेस, शर्टिंग, सुटिंग, होजियरी ने नटलेल्या भव्य आणि सुशोभित आकर्षक दालनास भेट देऊन पाहणी केली. याप्रसंगी "रूपा मॅचिंग कॉर्पोरेशन अकलूज" चे सर्वेसर्वा अजित शांतीलाल गांधी, अक्षय अजित गांधी, सौ. दीपिका अक्षय गांधी यांनी वडिलोपार्जित जिव्हाळा जपत जुन्या आठवणींना उजाळा दिला. कापड व्यवसायातील जुन्या, नव्या स्पर्धकां बरोबर यशस्वीपणे वाटचाल करण्याचा हातखंडा जपण्यातील कौशल्य यावरही चर्चा घडली.

"दुकान नयी | विश्वास वही" || हे ब्रीद वाक्य जपत "रूपा मॅचिंग कॉर्पोरेशन अकलूज" च्या माध्यमातून नव्या पिढीची चाललेली व्यवसायिक यशस्वी वाटचाल खरोखरच प्रशंसनीय आणि अभिनंदनीयच आहे" असे मत यानिमित्ताने सेवा जेष्ठ पत्रकार भाग्यवंत लक्ष्मण नायकुडे यांनी व्यक्त केले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या