मनाची शुद्धता
वृत्त एकसत्ता न्यूज
संकलक : आकाश भाग्यवंत नायकुडे
अकलूज दिनांक 06/07/ 2026 :
स्वभावात _संयम_ फार महत्त्वाचे काम करतो. ज्याच्या मनावर संयम आहे त्याच्याकडून कधीच अयोग्य निर्णय किंवा अयोग्य कृती घडणार नाही हे निश्चित.
संयमाचा अभाव असतो तेव्हा मनावर ताबा राहत नाही. कोणतीही प्रतिक्रिया तीव्र स्वरूपात दिली जाते. वागणे-बोलणे यावर नियंत्रण राहत नाही. त्यामुळे परस्परसंबंध बिघडतात.
क्रोधावर नियंत्रण न राहिल्याने वादविवाद होतात, अगदी तीव्र स्वरूपाचे गुन्हे होतात. त्यामुळे डोके शांत ठेवणे, बोलताना संयम ठेवणे गरजेचे असते. तोंडातून बाहेर पडलेले शब्द परत घेता येत नाहीत.
आजचा संकल्प
कोणत्याही परिस्थितीत डोके शांत ठेवणे, टोकाची भूमिका न घेणे, परिणामांचा विचार करून वागणे या गोष्टींचा गांभीर्याने अंगीकार करू व सदाचरण करू.
सौ. स्नेहलता स. जगताप.

0 टिप्पण्या