मनाची शुद्धता
वृत्त एकसत्ता न्यूज
संकलन : आकाश भाग्यवंत नायकुडे
अकलूज दिनांक 29/7/2026 :
दैनंदिन जीवनात अनेकदा असे प्रसंग येतात की क्षणात आपला रागाचा पारा चढतो, भावना अनावर होतात व आपण स्वतःला आवरू शकत नाही; मग आपण तोंडाला येईल ते बोलून जातो.
सामोरच्या व्यक्तीला किंवा आसपासच्या ऐकणाऱ्या लोकांना काय वाटत असेल, याचा आपण विचारच करत नाही; तसेच त्या व्यक्तीचा आपल्याबद्दल गैरसमज होईल, याचाही विचार करत नाही.
खरे तर थोड्या वेळाने राग शांत झाला की आपण काय बोलून बसलो याचा पश्चाताप होतो, पण त्याचा काही उपयोग नसतो; म्हणूनच रागावर नियंत्रण असणे खूप गरजेचे आहे.
आजचा संकल्प
रागाच्या भरात आपल्याच माणसांना नको ते बोलून दुखावण्यापेक्षा मनातल्या मनात दहापर्यंत आकडे मोजू, शांत होऊ व नंतरच संयमाने चर्चा करू; आणि वादाच्या मुद्द्यातून योग्य मार्ग काढू.
सौ. स्नेहलता स. जगताप

0 टिप्पण्या