मनाची शुद्धता

 


मनाची शुद्धता 

वृत्त एकसत्ता न्यूज 

संकलक : आकाश भाग्यवंत नायकुडे 

अकलूज दिनांक 01/07/2026 :

सध्या वेगवेगळ्या आजारांचे प्रमाण वाढले आहे. किरकोळ आजार तर आहेतच पण हृदय, फुफ्फुस, किडनी, पित्ताशय, आतडी, मेंदू यांच्या व्याधी आणि आजार जास्त वाढले आहेत.

सर्वसाधारणपणे दूषित हवा, पाणी व अन्न हे आजारांचे मूळ कारण असते. पोटात दूषित गेले की शरीर ते बाहेर फेकते किंवा लक्षणे दिसू लागतात. सर्दी, पडसे, ताप येणे, उलट्या-जुलाब यातून आपण चार दिवसात बाहेर पडतो.

पण अन्न भेसळ, प्रदूषित हवा, पाणी किंवा रासायनिक खते, फवारणी करून पिकवलेली पिके, फळे, भाजीपाला हे आपल्या शरीराला हळूहळू कमकुवत करतात. वरून पदार्थांमध्ये होणारी भेसळ वेगळीच.

 आजचा संकल्प 

जितके घरी बनवलेले पदार्थ खाता येतील तितके आहारात ठेवू. बाहेर बनवले जाणारे दुग्धजन्य पदार्थ, गाडीवर तयार केले जाणारे नाश्त्याचे पदार्थ वगैरे खाणे टाळू व स्वतःचे आरोग्य जपू.

सौ. स्नेहलता स. जगताप.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या