राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांची जयंती अकलूज मध्ये साजरी
वृत्त एकसत्ता न्यूज
आकाश भाग्यवंत नायकुडे
अकलूज दिनांक 26/06/2026 :
सम्यक विचार मंच अकलूज (तालुका माळशिरस, जिल्हा सोलापूर) या संघटनेच्या वतीने राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांची जयंती अकलूज मध्ये साजरी करण्यात आली. त्यानिमित्त विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक स्थळी राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या प्रतिमेचे आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याचे पूजन संम्यक विचार मंच चे मार्गदर्शक व अकलूज वैभव आणि वृत्त एकसत्ताचे संस्थापक संपादक, सेवा जेष्ठ पत्रकार भाग्यवंत लक्ष्मण नायकुडे यांच्या हस्ते होऊन विनम्र अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी आदिनाथ मोहन जाधव यांनी राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या जीवन कार्याची महती आपल्या प्रास्ताविकाद्वारे विशद केली. आज शाळेला सुट्टी असल्यामुळे जयंतीनिमित्त शालेय विद्यार्थ्यांना वह्यांचे वाटप उद्या करण्यात येणार असल्याची माहिती यावेळी सम्यक विचार मंच चे अध्यक्ष लक्ष्मण नामदेव खंडागळे यांनी सांगितली.
याप्रसंगी नॅशनल युनियन बॅकवर्ड एससी एसटी अँड मायनॉरिटी महासंघ नवी दिल्ली अर्थात एन यु बी सी चे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष राज्य संपर्क व प्रसिद्धीप्रमुख भाग्यवंत लक्ष्मण नायकुडे, सम्यक विचार मंच चे अध्यक्ष लक्ष्मण नामदेव खंडागळे, प्रभाकर बलभीम पाटील, विलासनंद विठ्ठल गायकवाड, राजू अगंद गायकवाड, आदिनाथ मोहन जाधव, राजीव रामचंद्र खरात, प्रशांत पंडित खरात, अजित तानाजी धाईंजे, लक्ष्मण भगवान बनसोडे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

0 टिप्पण्या