मनाची शुद्धता
वृत्त एकसत्ता न्यूज
संकलक : आकाश भाग्यवंत नायकुडे
अकलूज दिनांक 27/7/2026 :
आपण नेहमी स्वतःचा व स्वतःच्या फायद्याचाच विचार करतो. आपला फायदा कसा होईल, आपण इतरांपेक्षा वरचढ कसे होऊ किंवा आपल्यालाच सर्व जण चांगले कसे म्हणतील, असे विचार करतो व त्यानुसारच वागतो.
प्रत्येकाने जर असाच विचार केला आणि केवळ स्वतःपुरता स्वार्थ पाहिला, तर कौटुंबिक किंवा सामाजिक संबंध सलोख्याचे कसे राहतील? एकमेकांना मदत करणे, स्वार्थीपणा न करता उदार मनाने इतरांना उपयोगी पडणे हे कधीही योग्यच असते.
आपल्या जन्मापासून ते शेवटच्या क्षणापर्यंत आपल्यालासुद्धा इतरांची मदत होतच असते. आपल्या प्रत्येक जडणघडणीमध्ये इतरांचा मोठा सहभाग असतो; म्हणूनच आपणही इतरांच्या हितासाठी उपयोगी पडणे हे आपले कर्तव्यच आहे.
आजचा संकल्प
स्वहिताइतकेच इतरांच्या हिताकडे लक्ष दिले, तर समाजात वावरताना आपले जगणे सुसह्य व समृद्ध होते, हे लक्षात घेऊ आणि प्रत्येकाशी सहकार्याच्या भावनेने वागू.
सौ. स्नेहलता स. जगताप.

0 टिप्पण्या