विचारधारा

 


विचारधारा 

वृत्त एकसत्ता न्यूज

संकलन : आकाश भाग्यवंत नायकुडे

अकलूज दिनांक 28/7/2026 :

आपण सर्वांनी शाळेत कारगील विजय दिन साजरा केला, आपल्या जवान बांधवांविषयी कृतज्ञता व्यक्त केली आणि सीमेवरील त्यांचे जीवन किती खडतर व कष्टाचे असते, ते समजावून घेतले.

आपले फौजी बांधव आपला देश शत्रूच्या कारवायांपासून सुरक्षित राहावा म्हणून स्वतःच्या जीवाची पर्वा न करता, कुटुंबीयांपासून दूर राहून अहोरात्र देशाची सेवा करतात.

मुलांनो, आपलीसुद्धा देशाप्रति काही कर्तव्ये आहेत ना? शालेय वयातच आपण आपल्या अंगी शिस्त कशी बाणवता येईल, यासाठी दक्ष राहिले पाहिजे. आपल्यामध्ये आज्ञाधारकपणा तर हवाच; तसेच *'माझा देश'* ही निस्सीम भावना जर याच वयात मनात रुजली, तर समाजातील कोणतीही विघातक गोष्ट घडणारच नाही.

 *'हा देश माझा, मी या देशाचा!'* या भावनेने स्वतःला घडवू व आपल्या भारत देशाचे नाव जगात उज्ज्वल करू!

सौ. स्नेहलता स. जगताप

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या