अकलूज नगरपरिषदेस भिमक्रांती बहुउद्देशीय सामाजिक संस्थेच्या वतीने निवेदन
वृत्त एकसत्ता न्यूज
आकाश भाग्यवंत नायकुडे
अकलूज दिनांक 01/07/2026 : येथील व्यंकटनगर, पहिली गल्ली परिसरातील नागरिकांना अनेक दिवसांपासून तीव्र पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. या गंभीर समस्येची तातडीने दखल घेऊन परिसरात बोअरद्वारे पाणीपुरवठा उपलब्ध करून देण्यात यावा, या मागणीसाठी भिमक्रांती बहुउद्देशीय सामाजिक संस्थेच्या वतीने दिनांक 1 जुलै रोजी अकलूज नगरपरिषद कार्यालयात निवेदन देण्यात आले.
याप्रसंगी संस्थापक अध्यक्षा स्वाती अविनाश धाईंजे, सचिव छाया विजय माने, खजिनदार किरण खंडागळे, राजश्री पवार, युवक अध्यक्ष अविनाश धाईंजे, लक्ष्मी पवार, उपाध्यक्षा मैना गायकवाड, आसमा तांबोळी तसेच व्यंकटनगर, पहिली गल्ली येथील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. जनसेवा हाच आमचा संकल्प! या ब्रीद वाक्यानुसार भिमक्रांती बहुउद्देशीय सामाजिक संस्था ही समाजातील प्रत्येक नागरिकाच्या न्याय्य हक्कासाठी, मूलभूत सुविधांसाठी आणि जनहिताच्या प्रश्नांसाठी सातत्याने कार्यरत असून, जनतेच्या प्रश्नांना न्याय मिळेपर्यंत संघर्ष सुरूच राहील असे या निमित्ताने स्वाती धाईंजे यांनी अकलूज वैभव आणि वृत्त एकसत्ता ला सांगितले.

0 टिप्पण्या