संत सोपान काका महाराज पालखी सोहळ्याचे उत्साहात स्वागत

 


संत सोपान काका महाराज पालखी सोहळ्याचे उत्साहात स्वागत

वृत्त एकसत्ता न्यूज

आकाश भाग्यवंत नायकुडे

अकलूज दिनांक 20/7/2026 :

संत सोपानदेव महाराज पालखी सोहळ्याचे स्वागत  मोठ्या उत्साहात  करण्यात आले. स्वागतानंतर पालखी सोहळा अकलूज शहराकडे मार्गस्थ झाला. यावर्षीपासून पालखी  धवल श्रीराम मंदिरात मुक्कामी

असून या ठिकाणी पालखी सोहळा रात्री उशिरा विसावला.

संत सोपानदेव महाराज पालखी सोहळ्याची

सासवड ते पंढरपूर आषाढी पायी वारी करण्याची परंपरा १९०४ पासुन सुरु झाली. यावर्षीच्या १२२ व्या पालखी सोहळ्याचे सोलापूर जिल्ह्यात अकलुज येथे आगमन झाले.

जिल्हा प्रशासनाच्या वतीने विभागीय पोलीस अधिकारी बसवराज शिवपुजे व मुख्याधिकारी सचिन पाटील यांनी तसेच महाराष्ट्र राज्य जनसेवा संघटनेच्या वतीने डॉ. धवलसिंह मोहिते पाटील यांनी स्वागत केले

 सासवड इथून मार्गस्थ झालेला पालखी सोहळा पांगारे, मांडकी, निंबुत, सोमेश्वर, माळेगांव, बारामती ,लासुर्णे ,निरवांगी, अकलूज, तोंडले बोंडले, भंडीशेगांव, वाखरी, पंढरपूर असा १९० कि मी.चा पायी प्रवास १४ दिवसात केला जातो.वारी वाटेवर अश्वांचे सोमेश्वर, माळेगांव(गोल),बाजीराव विहीर व पादुका मंदिर पंढरपूर(उभे) रिंगण होते.रींगणासाठी अजित पथकाने पाटील अंजनगाव बारामती यांचे राजा व रामु अश्व धावतात. ॲड.त्रिगुण गोसावी हे सोहळा प्रमुख असुन गोपाळ गोसावी संस्थान प्रमुख आहेत. चोपदार म्हणुन मनोज रणवरे(राख),हरीभाऊ शिंदे (सासवड)हे पाहत आहेत. सोहळ्याचे स्वागत व पादुका पुजन डॉ धवलसिंह मोहिते पाटील व उर्वशीराजे मोहिते पाटील उभयंताच्या हस्ते करण्यात आले. आजचा मुक्कामानंतर पालखी सोहळा तोंडले बोंडले मुक्कामी जाणार असल्याचे सोहळा प्रमुख ॲड. त्रिगुणदादा गोसावी‌ महाराज यांनी सांगितले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या