शते:षु जायते शुरा सहस्त्रेषु पंडिता वक्ता दशसहस्त्रेषु दाता भवती ना भवती

 


शते:षु जायते शुरा 

 सहस्त्रेषु पंडिता 

  वक्ता दशसहस्त्रेषु  

 दाता भवती ना भवती

वृत्त एकसत्ता न्यूज 

संकलक : आकाश भाग्यवंत नायकुडे 

अकलूज दिनांक 29/06/2026 :

संस्कृत सुभाषिते म्हणजे कालातीत आहेत मागील पाच हजार  वर्षे व पुढील पाच हजार वर्षे त्यांचे अर्थ व त्यातील तथ्य समाजाला कायमपणे लागू पडणारी आहेत

 वरील सुभाषीताचा अर्थ असा आहे  शंभरात एखादा शूर असतो हजारात एखादा पंडित असतो दहा  हजारात एखादा वक्ता असतो दाता असतो असे नाही.

व्याख्यान संस्कृती

70- 80 च्या दशकात महाराष्ट्रात व्याख्यान संस्कृती होती व्याख्यानमाला, वसंत व्याख्यानमाला गावोगाव होत असत निरनिराळे वक्ते बोलवले जात वक्त्याच्या नावावर  गर्दी होत असे हजारो आबालवृद्ध स्त्री पुरुष नागरिक व्याख्यानाला हजर राहत.

समाजातील सांस्कृतिक सामाजिक व राजकीय संस्कृती जपली जात असे चांगले चांगले विचार ऐकायला मिळत याचा आमच्या पिढीला फार फायदा झाला मे महिना आला की वक्त्याची मागणी वाढे व दरवर्षी इर्षेने चांगले चांगले वक्ते आपल्या कार्यक्रमात असावेत अशी विविध संस्था मंडळी यांचा प्रयत्न असे गणेशोत्सवात सुद्धा व्याख्यानमाला असत.

त्यावेळी डीजे नाचकाम आषतबाजी याला स्थान नव्हते ज्या गणेशोमंडळाचा व्याख्यानमालेत चांगले वक्ते बोलावले जात व त्याला गर्दी होईल ते गणेश मंडळ चांगले समजले जाई यशस्वी समजले जायचे पण आता काळाचा महिमा आहे.

राजकीय पक्षांच्या सभांना सुद्धा श्रोते प्रेक्षक गोळा करून आणावे लागतात अनेक ठिकाणी पैसे व जेवण विशेषतः बिर्याणी असल्याखेरीज  श्रोते गर्दी करत नाहीत ही आता काळ बदलला आहे याची खूण आहे.

सुवर्णकाळ

 आपल्या महाराष्ट्रात व्याख्यान संस्कृतीचा एक सुवर्णकाळ होता त्यावेळी दमा मिरासदार, व्यंकटेश माडगूळकर , दि वी गोखले, प्राचार्य  अ रा तोरो, विष्णुजी क्षीरसागर असे अनेक नामवंत  वक्ते होते त्यांच्या व्याख्यानाला अलोट गर्दी व्हायची.

या सर्वांचे मेरुमणी म्हणजे फलटणचे प्राचार्य शिवाजीराव भोसले होत अत्यंत शांत आवाजात हातवारे नाहीत आवाजात चढउतार नाही पण ओधवती भाषा व अभ्यासू विचार यामुळे महाराष्ट्रभर शिवाजीराव भोसले यांचे व्याख्यान असले की आबालवृद्धा सह हजारो स्त्री-पुरुष व्याख्यानाला गर्दी करत 

योगी अरविंद घोष , सावरकर, डॉक्टर आंबेडकर ,भगतसिंग, अनेक क्रांतिकारक ,सुभाष चंद्र बोस, विवेकानंद असे अनेक महामानवांच्याबद्दल शिवाजीराव भोसले आपल्या अभ्यासपूर्ण व विशिष्ट शैलीतून विचार  मांडू लागले की ते ऐकणारे मंत्रमुग्ध होत आता व्याख्यान संस्कृती संपली 

आता सोशल मीडियामुळे व्याख्यानाना गर्दी होणे कमी झाले आहे 

नवीन पिढीला कदाचित  प्राचार्य शिवाजीराव भोसले यांचे नाव ऐकूनही माहित नसेल पण माझ्यासारख्या 70- 80 च्या दशकात  युवक असणाऱ्या अनेकांना शिवाजीराव भोसले भोसले यांचे  विस्मरण होणे अशक्य आहे.

 आज 29 जून

 आयुष्यभर यशस्वीपणे राष्ट्रवादी विचाराची पायाभरणी महाराष्ट्रभर करणाऱ्या या वक्ता दशसहस्त्रेषु असणाऱ्या प्राचार्य यांची आज पुण्यतीथी आहे 29 जून 2010 साली पुणे मुक्कामी त्यांना देवाज्ञा झाली.

 सुभाषितकारांनी म्हटल्याप्रमाणे वक्ता दशसहस्त्रेषु हे हे वाक्य  ज्यांना तंतोतंत लागू पडत होते त्या प्राचार्य शिवाजीराव भोसले यांच्या पुण्यतिथी निमित्त त्यांच्या स्मृतीला अभिवादन.

 महाराष्ट्रात राष्ट्रवादी विचारसरणीच्या पाया रचणाऱ्या या वक्त्यास पुन्हा एकदा अभिवादन!

 ॲड अनिल रुईकर 

98 232 55049

 इचलकरंजी

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या