विचारधारा
वृत्त एकसत्ता न्यूज
आकाश भाग्यवंत नायकुडे
अकलूज दिनांक 10/7/2026 :
महाराष्ट्रातील संतांचा पालखी सोहळा सुरू झाला आहे. प्रत्येक संतांच्या त्यांच्या तीर्थक्षेत्रातून पालख्या निघाल्या आहेत. वारकऱ्यांसह अनेक दिंड्या सहभागी झाल्या आहेत.
वृत्तपत्रांमधून बातम्या येतात, तशा त्या दूरदर्शनवर पण दाखवल्या जातात. आपल्या गावामधून जर कोणती पालखी जात असेल तर त्या संतांविषयी माहिती मिळवा. पालखीचा दैनंदिन कार्यक्रम काय असतो, त्याचे निरीक्षण करा.
दिंडीतील वारकरी मंडळींची सेवा करा. त्यांच्याबरोबर गप्पा मारा. त्यांना काही अभंग म्हणून दाखवा. त्यांचे पाय दाबा, पायाला मालिश करा. त्यांना चहा, पाणी, जेवण द्या.
या लहान वयात पंढरीला नाही जाता आले, तरी वारकऱ्यांमध्ये विठ्ठल पहा. त्यांची सेवा करा.
सौ. स्नेहलता स. जगताप.

0 टिप्पण्या