विचारधारा

 


विचारधारा 

वृत्त एकसत्ता न्यूज

संकलक : आकाश भाग्यवंत नायकुडे

अकलूज दिनांक08/07/2026 : 

आपल्या चेहऱ्यावरील हसरे भाव आपल्याला जेवढे समाधान देतात तेवढेच समोरच्याला पण देतात. हसऱ्या चेहऱ्याची माणसे समोरच्याचे निम्मे दुःख कमी करतात.

गंभीर चेहरा केल्याने आलेली समस्या कमी होत नाही. उलट आपला व दुसऱ्याचा पण मानसिक ताण वाढतो. परीक्षा जवळ आली म्हणून टेन्शन घेण्याऐवजी सुरुवातीपासून हसत-खेळत अभ्यास केला तर योग्य नाही का?

मुलांनो, आपल्यामुळे आपले पालक आणि शिक्षक यांना त्रास होऊ नये, त्यांचा मानसिक ताण वाढू नये याची काळजी घ्या. आपण जेव्हा समाधानी असतो तेव्हा नकळत आपल्या चेहऱ्यावर हसू फुटते.

वेळच्या वेळी गोष्टी करण्याची सवय आपल्याला समाधानी ठेवते व नकळत चेहऱ्यावर हसू उमटते.

सौ. स्नेहलता स. जगताप.

====================

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या