विचारधारा
वृत्त एकसत्ता न्यूज
संकलक : आकाश भाग्यवंत नायकुडे
अकलूज दिनांक08/07/2026 :
नेमेचि येतो मग पावसाळा याप्रमाणे महाराष्ट्रातील बहुतेक सर्व भागात पाऊस सुरू झाला. आता हळू हळू त्याचा वेग वाढेल. विहिरी, तलाव भरतील, नद्या प्रवाहित होतील आणि हळू हळू पूरस्थिती येईल.
चार दिवसांपूर्वी पाणी टंचाई जाणवत होती. पिके सुकली, जमिनींना भेगा पडल्या. मात्र पावसाळा संपताना इतके पाणीच पाणी होईल की जगणे मुश्किल होईल. पाऊस पडतोय पण पाणी पुरेशा प्रमाणात जिरवले व साठवले जात नाही व पुरवून पुरवून वापरले जात नाही. त्यामुळे दर पावसाळ्या पूर्वी ही दुष्काळी स्थिती.
मुलांनो, यासाठी काय करता येईल असे तुम्हाला वाटते? पावसाचे पाणी समुद्राला जाऊन मिळाले की ते वापरण्यासाठी योग्य रहात नाही. मग त्यासाठी ते समुद्रात जाण्यापूर्वी आपण काय केले पाहिजे? पाऊस उशिरा आला तरी पाणीटंचाई भासू नये म्हणून काय करता येईल?
विचार करा. मार्ग शोधा. आत्तापासून नियोजन केले नाही तर भविष्य महाकठीण असेल.
जयहिंद!🇮🇳
सौ. स्नेहलता स. जगताप.

0 टिप्पण्या