मनाची शुद्धता
वृत्त एकसत्ता न्यूज
संकलक : आकाश भाग्यवंत नायकुडे
अकलूज दिनांक08/07/2026 :
आपला रोजचा अनुभव असा आहे की एखादी गोष्ट करायची म्हटले की आपण म्हणतो नंतर करू. कोणी एखादे काम सांगितले की नंतर करतो. या 'नंतर'मुळे वेळ निघून जाते.
वेळच्या वेळी गोष्ट करणे फार महत्त्वाचे असते. हातातून वेळ गेल्यावर नंतर ते काम करून काय उपयोग? धो-धो पाऊस पडतोय व नंतर रेनकोट घालतो म्हटले तर तो वेडेपणा आहे हे वेगळे सांगायला नको.
आपण प्रत्येकाने वेळेचे महत्त्व समजूनच वेळेनुरूप काम केले पाहिजे, निर्णय घेतले पाहिजेत. क्वचित प्रसंगी उशीर होऊ शकतो, अगदी प्रत्येक काम वेळेत होईल असे नाही; पण प्रत्येक गोष्ट 'नंतर' म्हणून पुढे ढकलणे योग्य नाही.
आजचा संकल्प
उसवलेला कपडा वेळेत शिवला तर ठीक, नंतर शिवतो म्हटले तर तो अजून फाटत जाणार हे लक्षात घेऊ व 'नंतर करतो' म्हणण्याची सवय बदलू.
सौ. स्नेहलता स. जगताप.
=====================

0 टिप्पण्या