विचारधारा

 


विचारधारा 

वृत्त एकसत्ता न्यूज

संकलक : आकाश भाग्यवंत नायकुडे

अकलूज दिनांक 26/7/2026 :

🇮🇳कारगील विजय दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!🇮🇳


१९९९ मध्ये कुरापती पाकिस्तानने कारगील युद्धाची सुरुवात केली. घुसखोरांनी आपल्या सीमारेषा ओलांडून उंचावरील काही चौक्यांवर (पोस्ट्सवर) ताबा मिळवला.

भारतीय जवानांनी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत, उणे तापमानाला सामोरे जात, उंच शिखरांवर घुसखोरी करणाऱ्या पाकिस्तानी सैन्याला हुसकावून लावताना पराक्रमाची शर्थ केली.

मुलांनो, शौर्य, धैर्य, त्याग व देशप्रेम, कठीण भौगोलिक परिस्थितीवर कणखरपणे मात करण्याची वृत्ती आणि भारतमातेवरील निस्सीम निष्ठा यांच्या जोरावर आपल्या वीर जवानांनी विजयश्री खेचून आणली.

आपल्या देशाच्या सीमा अबाधित राखण्यासाठी जीवाची पर्वा न करता लढणाऱ्या आपल्या सर्व वीर जवानांना कोटी कोटी प्रणाम!

सौ. स्नेहलता स. जगताप.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या