मनाची शुद्धता

 


मनाची शुद्धता 

वृत्त एकसत्ता न्यूज 

आकाश भाग्यवंत नायकुडे

अकलूज दिनांक 10/7/2026 :

जीवनात आपल्याला जे हवे ते आपण देवाकडे मागतो. देवाला नमस्कार केला की आपली इच्छा व्यक्त करतो. वेळप्रसंगी नवस पण बोलतो. ती इच्छा पूर्ण व्हावी म्हणून आपण प्रयत्न पण करतो.

काही वेळेस आपल्या इच्छेप्रमाणे घडते, पण काही वेळेस घडत नाही. आपण नाराज होतो, देवाशी भांडतो. परत 'अगदी तुझे काहीच करणार नाही' असे सांगून अबोला पण धरतो.

खरे तर देव आपली परीक्षा पाहत आहे असे अनेकदा वाटते. एखाद्या व्यक्तीला कमी प्रयत्नात यश येते अन् मला का नाही, असेही वाटते. पण लक्षात घ्या, आपल्याला काय आवडते, काय हवे यापेक्षा आपल्यासाठी काय योग्य आहे, ते देव आपल्याला देतो.

 आजचा संकल्प 

आपली खरेच देवावर श्रद्धा असेल तर प्रयत्न करूनही एखादे ध्येय प्राप्त झाले नाही, तर जे झाले त्यात समाधान मानू व तेच आपल्यासाठी योग्य आहे असे समजू.

सौ. स्नेहलता स. जगताप.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या