स्वतःच्या महिमामंडनात रमलेले स्वमग्न नॉनबायोलॉजिकल विश्वगुरू...


स्वतःच्या महिमामंडनात रमलेले स्वमग्न नॉनबायोलॉजिकल विश्वगुरू...

वृत्त एकसत्ता न्यूज 

संकलक : आकाश भाग्यवंत नायकुडे 

अकलूज दिनांक 12/07/ 2026 :

ऑस्ट्रेलियाच्या पत्रकारांनी भारताचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांना आरसा दाखवला आहे. त्यामुळे जगभरात भारताची प्रतिमा डागाळली आहे.

मोदींनी ऑस्ट्रेलियामध्ये असं वक्तव्य केलंय की, त्यांच्या भेटीमुळे अनिवासी भारतीय (एनआरआय) खूप आनंदी होते. ऑस्ट्रेलियातील प्रत्येक एनआरआय हा त्यांचा म्हणजे मोदींचा भक्त आहे.

परंतू या तथाकथित वक्तव्याचं बिंग फोडत ऑस्ट्रेलियन माध्यमांनी असे वृत्त दिलंय की, मोदींचा जयजयकार करण्यासाठी ३०,००० भारतीयांना सिडनीहून चार्टर्ड विमानांनी मेलबर्नला आणण्यात आले. या सर्व एनआरआयच्या निवास आणि भोजनाची व्यवस्था करण्यात आली होती व यावर खूप पैसा खर्च केला गेला. म्हणजेच ऑस्ट्रेलियामध्ये मोदींसाठी भाड्याने आणलेला जमाव जमवण्यात आला होता.

नरेंद्र मोदींसाठी जमलेला हा बनावट जमाव भारताच्या आंतरराष्ट्रीय प्रतिमेवर एक डाग आहे. विमानतळावर जमणारा जमावसुद्धा बनावट असतो. हा जमाव अतिअभिनय करत असतो.

ब्लेक जॉन्सन या ऑस्ट्रेलियन पत्रकाराने तेथे मोदींनी पत्रकार परिषद न घेतल्याचा मोठा मुद्दा बनवला. यावर भारताला प्रत्युत्तर द्यावे लागले. आणि नरेंद्र मोदींनी पत्रकार परिषद न घेण्यामागे भारतीय लोकसंख्येचे ग्रामीण स्वरूप हे कारण दिले. नरेंद्र मोदींचा जन्म न्यूयॉर्कमध्ये झाला होता का?

ऑस्ट्रेलियन माध्यमांनी मोदींच्या खोट्या आंतरराष्ट्रीय प्रतिमेचे अक्षरशः वाभाडे काढून तिला उघडे पाडले आहे. भारतीय माध्यमे त्यावर झाकायचे निष्फळ प्रयत्न करत आहेत. 

खोटी प्रतिमा, शून्य आंतरराष्ट्रीय विश्वासार्हता, प्रभू रामाचा आणि देशाचा खजिना लुटल्याचा आरोप असलेला आणि उद्योगपतींचा एजंट असलेला पंतप्रधान हा भारतासाठी सर्वात मोठा धोका आहे.

अनिवासी भारतीयांची गर्दी जमवण्यासाठी परदेशात कोट्यवधी रुपये खर्च करणे हा सुद्धा एक भ्रष्टाचारच आहे. संपूर्ण जगाला मोदींचा घोटाळा समजला आहे. भारतालाही समजेल. भारताला हे सर्व समजायला एक मोठा धक्का बसावा लागतो. ज्या दिवशी हा धक्का बसेल, त्या दिवशी खऱ्या अर्थाने भारत स्वतंत्र होईल...

…. बाळासाहेब कदम

====================

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या