मनाची शुद्धता

 


मनाची शुद्धता

वृत्त एकसत्ता न्यूज 

आकाश भाग्यवंत नायकुडे

अकलूज दिनांक 11/7/2026 :

आपल्या मुलांना आपण नेहमी आई-वडील, गुरुजन व मोठ्या माणसांशी आदराने वागायला-बोलायला शिकवतो. मोठ्यांना वाकून नमस्कार करावा, त्यांचे आशीर्वाद घ्यावेत असेही सांगतो.

थोरा-मोठ्यांचे आशीर्वाद घेणे हे संस्कारी मनाला खूप भावते. आपल्याकडील रीतीरिवाजाप्रमाणे आपण कितीही मोठे झालो, तरी आपल्यापेक्षा मोठ्या लोकांना नमस्कार करतोच.

मात्र वयाने मोठे असणारे, मोठ्या पदावर असणारे किंवा स्वतःला आध्यात्मिक गुरू म्हणवून घेणारे सर्वच आदर देण्याच्या पात्रतेचे नसतात. लबाड, भोंदू लोक बोलतात एक व त्यांची कृती वेगळी असते. अशांच्या पुढे आपणही वाकू नये व मुलांना पण त्यांच्यापुढे वाकू देऊ नये.

 आजचा संकल्प

 चारित्र्य, विचार व वर्तन यावरून ती व्यक्ती आदरास पात्र आहे का याचा विचार करू. त्यांच्यापुढे नतमस्तक व्हायचे का ताठ मानेने उभे राहायचे ते ठरवू व स्वतःचा स्वाभिमान जपू.

सौ. स्नेहलता स. जगताप.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या