मनाची शुद्धता

 


मनाची शुद्धता

वृत्त एकसत्ता न्यूज 

संकलक : आकाश भाग्यवंत नायकुडे 

अकलूज दिनांक 12/07/ 2026 :

पंढरीची वारी पुढे पुढे चालली आहे. विठूनामाचा गजर करत, वेगवेगळ्या संतांचे अभंग म्हणत आनंदाने मार्गक्रमण चालू आहे. मुक्कामाच्या ठिकाणी भजन, कीर्तन, भारुड यांमधून प्रबोधन केले जाते.

भक्त पुंडलिक आपल्या सर्वांना एक चांगली शिकवण देतात. आई- वडिलांची सेवा करण्यात खंड पडू नये म्हणून त्यांनी देवाला विटेवर उभे केले व त्यांच्या सेवेत व्यत्यय येऊ नये म्हणून देव अठ्ठावीस युगे विटेवर उभे आहेत.

आपण काय शिकतो यातून? किती व कशी सेवा करतो आई-वडिलांची? आज समाजात किती वृद्ध व्यक्ती निराधार आहेत! गरीब-श्रीमंत सर्व स्तरात आई-वडील हे जणू एक समस्या झाले आहेत.

आजचा संकल्प

समाजातील वृद्धाश्रम व पाळणाघरे म्हणजे कुटुंबव्यवस्थेची लक्तरे आहेत. भक्त पुंडलिकांची शिकवण अंगीकारू व जन्मदात्यांची मनोभावे सेवा करू.

सौ. स्नेहलता स. जगताप.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या