विचारधारा

 विचारधारा

वृत्त एकसत्ता न्यूज 

संकलक : आकाश भाग्यवंत नायकुडे 

अकलूज दिनांक 05/07/ 2026 :

आपल्या मनात नेहमी वेगवेगळे विचार येत असतात. सकारात्मक विचार येतात तसे नकारात्मक पण येतात. सकारात्मक विचार आनंद देतात तर नकारात्मक विचारांनी मनाला त्रास होतो.

आपण दुसऱ्यांच्या बद्दल जरी चिडून, वैतागून भावना व्यक्त करत असलो किंवा त्यांच्याशी भांडत असलो तरी त्याचा आपल्या शरीरावर, मनावर दुष्परिणाम जाणवतो. मनाला वेदना होतात.


मुलांनो, चिडून जेव्हा दुसऱ्याला दोन फटके देता तेव्हा तितक्याच वेदना तुमच्या हाताला होतात. ही क्रिया-प्रतिक्रिया असते. म्हणून शक्यतो आपण सकारात्मक विचारात रहावे जेणेकरून आपल्या व आपल्या समवेत असलेल्या इतरांनाही आनंद मिळतो.

आनंदी विचार करा, आनंद लुटा, आनंदी रहा.

🇮🇳सौ. स्नेहलता स. जगताप.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या