विचारधारा
वृत्त एकसत्ता न्यूज
संकलक : आकाश भाग्यवंत नायकुडे
अकलूज दिनांक 06/07/ 2026 :
विद्यार्थीदशेत आपल्याला आपल्यातील अंगीभूत गुण वाढीस लावण्याची अनेक स्पर्धांमधून संधी मिळते. आपल्यातील सुप्त गुणांची ओळख होते. भविष्यात आपण काय करू शकतो हे समजते.
अर्थात त्यासाठी प्रयत्न, सराव व सातत्य गरजेचे असते. बियाण्यात रोप असते पण ते जमिनीत गाडून घेतल्याशिवाय बाहेर येत नाही. नारळातील गोड पाणी फोडल्याशिवाय बाहेर येत नाही.
मुलांनो, आपल्यालासुद्धा आपल्यातील गुण ओळखण्यासाठी किंवा इतरांना ते दिसण्यासाठी लढा द्यावा लागतो, संघर्ष करावा लागतो. विविध स्पर्धांमध्ये सहभागी व्हावे लागते. आपले शिक्षक आपल्यात लपलेल्या गुणांना पैलू पाडण्याचे पवित्र कार्य करत असतात.
आपले व्यक्तिमत्त्व विकसित होण्यासाठी जे जे करता येईल ते करू व यशस्वी जीवन जगू.
सौ. स्नेहलता स. जगताप.

0 टिप्पण्या