विद्यार्थ्यांवर लाठीमार म्हणजे म्हणजे देशाच्या भविष्यावर लाठीमार - सयाजीराजे मोहिते पाटील
वृत्त एकसत्ता न्यूज
आकाश भाग्यवंत नायकुडे
अकलूज दिनांक 26/7/2026 :
देशाचे भविष्य असणाऱ्या विद्यार्थ्यांचे जंतर-मंतरवर शांततेने चाललेले आंदोलन चिरडून टाकण्यासाठी त्यांच्यावर सरकारने अमानुष लाठीमार केला. विद्यार्थ्यांवर लाठीमार म्हणजे देशाच्या भविष्यावर लाटठीमार असे प्रतिपादन सयाजीराजे मित्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष, अकलूज नगरपरिषद नगरसेवक सयाजीराजे संग्रामसिंह मोहिते पाटील यांनी केले. मित्र मंडळाच्या वतीने सदभाऊ चौक अकलूज येथून काढलेल्या निषेदाच्या अति भव्य मोर्चाच्या अग्रस्थानी राहून संबोधन करताना ते बोलत होते.
सयाजीराजे मोहिते पाटील यांचे नेतृत्वाखाली मोर्चाने जाऊन निषेधासह मागण्यांचे निवेदन अकलूज पोलिसांना देण्यात आले. या विशाल मोर्चामध्ये विद्यार्थी, गाळेधारक व्यावसायिक, व्यापारी, नागरिक बहुसंख्येने सहभागी झाले होते.


0 टिप्पण्या