महागाईमुळे ५२ कोटी भारतीयांच्या ताटातून 'पौष्टिक आहार' गायब, संयुक्त राष्ट्रांची माहिती

 


महागाईमुळे ५२ कोटी भारतीयांच्या ताटातून 'पौष्टिक आहार' गायब, संयुक्त राष्ट्रांची माहिती 

वृत्त एकसत्ता न्यूज

संकलक : आकाश भाग्यवंत नायकुडे

अकलूज दिनांक 27/7/2026 :

नवी दिल्ली : देशात भूक आणि कुपोषणाचे प्रमाण काही अंशी कमी झाले असले, तरी कोट्यवधी लोकांच्या ताटात आजही संतुलित व पौष्टिक जेवण पोहोचू शकलेले नाही. देशातील सुमारे ५२ कोटी नागरिक रोजच्या रोज निरोगी आणि पौष्टिक _अन्न_ खरेदी करण्यास असमर्थ आहेत. म्हणजेच, फळे, भाज्या, डाळी, दूध व प्रथिनयुक्त _अन्न_ यांसारख्या मूलभूत पोषण गरजा नियमितपणे पूर्ण करणे या मोठ्या लोकसंख्येला परवडत नाही.

संयुक्त राष्ट्रांच्या ‘स्टेट ऑफ फूड सिक्युरिटी अँड न्यूट्रिशन इन द वर्ल्ड’ २०२६ च्या अहवालातून ही गंभीर माहिती समोर आली. या अहवालानुसार, भारताने गेल्या दोन दशकांत कुपोषण कमी करण्यात ४२ टक्क्यांची प्रगती साधली आहे. २०१९ ते २०२५ दरम्यान पौष्टिक आहार खरेदी करण्यास असमर्थ लोकांच्या संख्येतही २९ टक्के घट झाली.

कुपोषणाऐवजी आता लठ्ठपणाची मोठी समस्या : अहवालात नमूद केल्यानुसार, भारतातील मुलांमधील ठेंगणेपणा आणि प्रौढांमधील वाढता लठ्ठपणा हा चिंतेचा विषय बनला आहे. यामुळे देशात केवळ अन्न सुरक्षेवर भर न देता पोषण सुरक्षेवर अधिक लक्ष केंद्रित करण्याची गरज निर्माण झाली आहे. 

*दररोजचा आहारावरील खर्च* 

    -भारत    ₹३४३

    पाकिस्तान    ₹३४३

    बांगलादेश    ₹३९९

    चीन    ₹३१७ 

    अमेरिका    ₹२४९ 

जागतिक वास्तव

अहवालानुसार, वर्ष २०२४ मध्ये जगातील ५ वर्षांखालील ३२.९ टक्के बालके ठेंगणेपणाने प्रभावित होती, तर लहान मुले व वयोवृद्धांमध्ये लठ्ठपणाचा दर सातत्याने वाढत आहे. सध्याच्या गतीने जग २०३० पर्यंत 'झिरो हंगर' उद्दिष्ट गाठू शकणार नाही. जगभरात २६९ कोटी लोक पौष्टिक अन्न खरेदी करण्यास असमर्थ आहेत. 

सौजन्य: ऑनलाइन लोकमत

संकलन : यशवंत वाघ

************************

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या