मनाची शुद्धता

 


मनाची शुद्धता

वृत्त एकसत्ता न्यूज

संकलन : आकाश भाग्यवंत नायकुडे

अकलूज दिनांक 28/7/2026 :

नैतिक जबाबदारी हा शब्द आपण नेहमी वापरतो; प्रत्येकाला नैतिक जबाबदारी समजली पाहिजे आणि समाजात वावरताना हे खूप गरजेचे आहे. पण आपण वैयक्तिक पातळीवर ती खरोखर पाळतो का? 'कळते पण वळत नाही', अशी आपली स्थिती असते.

सार्वजनिक ठिकाणी स्वच्छता ठेवणे हे प्रत्येकाने पाळायला नको का? रस्त्यावर, जिन्यात, भिंतींवर थुंकणे, खाईल तिथेच कचरा टाकणे, जलस्रोतांमध्ये कचरा टाकणे आणि जोरजोरात आरडाओरडा करणे... हे सर्व आपण टाळायला नको का?

परदेशांतील शिस्तीचे व स्वच्छतेचे गोडवे आपण गातो, मग तसेच आपल्या देशात का नाही वागायचे? सगळी जबाबदारी शासनावर सोडून आपण काय करायचे? आपली नागरिक म्हणून काहीच कर्तव्ये नाहीत का?

आजचा संकल्प

आपण प्रत्येक जण स्वतःची नैतिक जबाबदारी ओळखून, वैयक्तिक पातळीवर सार्वजनिक ठिकाणी कचरा व अस्वच्छता न करण्याचा मनोमन संकल्प करू आणि आपली सार्वजनिक ठिकाणे नेहमी स्वच्छ ठेवू.

सौ. स्नेहलता स. जगताप.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या