मनाची शुद्धता

 


मनाची शुद्धता

वृत्त एकसत्ता न्यूज

संकलक : आकाश भाग्यवंत नायकुडे

अकलूज दिनांक08/07/2026 :

दिवसभरच्या धावपळीनंतर आपल्याला प्रत्येकाला विश्रांती हवी असते. थोडा आराम केला की बरे वाटते. तसे काम चालू असताना सुद्धा मध्येच थोडा विसावा हवा असतो.

या वेळेत काहीच करायचे नाही. वाचन-लेखन नाही, मोबाईल नाही, शिकणे नाही किंवा स्वतःला सुधारण्याचा प्रयत्नही नाही. काहीच करायचे नाही. हे काहीच न करणे यातून मेंदूला विश्रांती मिळते व मेंदूची कार्यक्षमता वाढते.

या विश्रांतीमधून आपले भावनिक संतुलन वाढते, सर्जनशीलता वाढते. आपण स्वतःला जवळून ओळखतो. अशा क्षणी आपल्याला वेगळे काहीतरी सूचते. बाह्य गोंधळापासून दूर राहिल्याने मनःशांती मिळते.

यामुळे आपण वर्तमान काळात राहतो. आपल्या जगण्यात आपल्याला आनंद सापडतो, जो आपल्या दृष्टीत आपल्या जगण्यात असतो. या विसाव्याच्या क्षणी आपण स्वतःचे अस्तित्व ओळखतो व जे आहे ते मान्य करतो.

आजचा संकल्प

भूतकाळातील बऱ्या-वाईट गोष्टी आठवणे किंवा भविष्यकाळाची वृथा चिंता करण्या पेक्षा वर्तमानकाळातील काही क्षण काहीच न करता स्वतःला ओळखण्यासाठी घालवू व स्वतःला ऊर्जा देऊ.

 सौ. स्नेहलता स. जगताप.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या