मनाची शुद्धता
वृत्त एकसत्ता न्यूज
संकलक : आकाश भाग्यवंत नायकुडे
अकलूज दिनांक 05/07/2026 :
अनेकदा आपल्याला जे आवडते ते सगळे आपल्याला मिळेलच असे नसते. काही गोष्टी मनासारख्या मिळतात, काही नाही मिळत. अशावेळेस ज्या मिळाल्यात त्यात समाधान मानायचे. जे नाही मिळाले ते मिळवण्यासाठी प्रयत्न करायचा.
नेहमीच प्रयत्नाला यश येईल असेही नसते. कधी कधी कितीही अट्टाहास केला तरी हव्या असलेल्या गोष्टी नाही मिळत. अशावेळेस अती अट्टाहास करण्यापेक्षा हट्ट सोडून द्यायचा व आहे त्यात समाधान मानायचे असेही करावे लागते.
खरे तर यालाचा जीवन म्हणायचे. सर्वच गोष्टी मनाप्रमाणे घडत गेल्या तर लढण्याची सवय कशी लागणार? जगण्यासाठीची उर्मी कुठून मिळणार? संघर्ष तर हवाच. उलट काहीतरी कमी दिले म्हणून देवाचे आभार मानले पाहिजेत.
आजचा संकल्प
जे आहे त्यातच साजरे जीवन जगण्याचे समाधान व चांगले काहीतरी करण्याची जिद्द उराशी ठेवू व जीवनाचा संघर्ष यशस्वी करू.
सौ. स्नेहलता स. जगताप.

0 टिप्पण्या