श्री संत चांगावटेश्वर महाराज पालखी सोहळ्याचे सोलापूर जिल्ह्यात स्वागत
वृत्त एकसत्ता न्यूज
संकलक : आकाश भाग्यवंत नायकुडे
अकलूज दिनांक 24/7/2026 :
श्री संत चांगावटेश्वर महाराज पालखी सोहळ्याचे आगमन सोलापूर जिल्ह्यात शुक्रवार दिनांक 24 रोजी झाले असून या पालखी सोहळ्याचे स्वागत प्रशासनाच्या वतीने करण्यात आले. अकलूज येथील महादेव मंदिरात या पालखीचा मुक्काम आहे.
संत योगीराज चांगावटेश्वर महाराज पालखी सोहळ्याची सुमारे ११० वर्षांपूर्वीची परंपरा आहे. या पालखी सोहळ्याचे प्रस्थान सासवड येथील लक्ष्मीनारायण मंदिरातून गुरुवार (ता १५ जून) रोजी झाले होते. पंढरीच्या पांडुरंगाच्या दर्शनाची आस मनामध्ये ठेवून निघालेल्या या पालखी सोहळ्याने कारगाव, भोरीएंडी, यवत, पाटस, रावणगाव, शेटफळगडे, भिगवन, डाळज नं.१ , इंदापूर असा प्रवास करून अकलूज येथे मुक्कामासाठी आली आहे. दरम्यान रावणगाव येथे गोल रिंगण तर शेटफळगड येथे मेंढ्यांचे गोल रिंगण पार पडले असल्याची माहिती सोहळा प्रमुख जनार्दन बावळे यांनी दिली यावेळी चोपदार शशिकांत जगताप उपस्थित होते.
पालखी सोहळा सोलापूर जिल्ह्याच्या हद्दीवर स्वागतासाठी पुरंदरचे आमदार चंदूकाका जगताप उपस्थित होते. सोपानकाका पतसंस्थेच्या वतीने पालखीतील वारकऱ्यांचे स्वागत करण्यात आले यावेळी आमदार जगताप यांचा वतीने पालखीतील सर्व वारकऱ्यांना चिक्कीचे वाटप करण्यात आले
या पालखी सोहळ्याचे सोलापूर जिल्ह्यात आगमनापासून सह. पोलीस फौजदार हनुमंत झरे यांचे नियंत्रणाखाली पाच पोलीस व पंधरा होमगार्ड यांच्यावर संरक्षण देण्याची जबाबदारी आहे. हा सोहळा उद्या पंढरपूरकडे जाण्यासाठी बोंडले या गावाकडे रवाना होणार आहे.
फोटोओळी : अकलूज : श्री संत चांगावटेश्वर महाराज पालखी सोहळा सोलापूर जिल्ह्याच्या हद्दीवर स्वागत करताना पुरंदरचे आमदार चंदूकाका जगताप, प्रमुख जनार्दन बावळे चोपदार शशिकांत जगताप आदी.

0 टिप्पण्या