ओंकार परिवाराचे चेअरमन बाबुराव बोञे पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबिर संपन्न
वृत्त एकसत्ता न्यूज
आकाश भाग्यवंत नायकुडे
अकलूज दिनांक 11/07/ 2026 : ओंकार साखर कारखाना परिवाराचे चेअरमन बाबुराव बोञे पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त निमगाव (मगराचे) ता माळशिरस येथे बाबुराव बोञे पाटील ग्रामविकास प्रतिस्ठानच्या वतीने आयोजित केलेल्या रक्तदान शिबिरात १११ जणांनी रक्तदान केले. शिबिराचे उद्घाटन निमगाव सरपंच सुभाष साठे यांच्या हस्ते करण्यात आले तर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी तंटामुक्त समितिचे अध्यक्ष ॲङ. लक्ष्मण मगर होते.
ग्रामीण भागामध्ये रक्तदान चळवळ रूजावी जास्तीत रक्तदाते उस्फूर्तपणे तयार व्हावेत व सामाजिक बांधलीकी म्हणून बोञे पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त म्हणून रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते या रक्तदान शिबिरात जास्तीत जास्त रक्तदान केल्याबद्दल लक्ष्मण घाडगे व कालिदास मगर यांचा सन्मान करण्यात आला या वेळी जनरल मॅनेजर भिमराव वाघमोङे, ऊस उत्पादक शेतकरी अशोक मगर, नागनाथ मगर, सर्जेराव पवार, प्रताप मगर, विश्वनाथ मगर, राज मगर, दादासाहेब पवार, मल्हारी मगर, विजय मगर, सुरेंद्र मगर, ओंकार साखर कारखान्याचे आधिकारी, कर्मचारी, बहुसंख्य शेतकरी उपस्थित होते. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्राथमिक आरोग्य केंद्रातील ङाॅक्टर व कर्मचारीवर्ग व बाबुराव बोञे पाटील ग्रामविकास प्रतिष्ठान पदाधिकारी परिश्रम घेतले. शेवटी रामभाऊ मगर यांनी आभार मानले.

0 टिप्पण्या