विचारधारा
वृत्त एकसत्ता न्यूज
संकलक : आकाश भाग्यवंत नायकुडे
अकलूज दिनांक 27/7/2026 :
शालेय जीवनात आपल्या वर्गात वेगवेगळ्या परिस्थितींशी झगडणारी मुले असतात; सगळेच सुस्थितीत असणारे नसतात. ज्यांची आर्थिक परिस्थिती नाजूक असते, अशी मुले नेहमी विचारांत गढलेली असतात.
अशा मुलांना तुच्छ लेखण्याऐवजी त्यांना मैत्रीचा हात दिला, तर त्यांचीही शैक्षणिक प्रगती होईल. परिस्थितीने पोळलेल्या या मुलांना अभ्यास करून पुढे जायचे असते व परिस्थितीवर मात करायची असते; ही मुले अत्यंत जिद्दी असतात.
यांच्याशी मैत्री केली तर आपलीसुद्धा बौद्धिक व वैचारिक प्रगती होऊ शकते. आपल्याकडील अतिरिक्त पुस्तके किंवा शैक्षणिक साहित्याचा त्यांना उपयोग होऊ शकतो. त्यांना कोणतीही वाईट संगत नसल्याने आपल्यालाही एक चांगला नि सच्चा मित्र मिळू शकतो.
शाळेत असताना अशा मुलांशी मैत्री करा, ज्यांच्यामुळे आपल्याला चांगल्या सवयी लागतील आणि जीवनाची योग्य दिशा मिळेल.
सौ. स्नेहलता स. जगताप.

0 टिप्पण्या