आनंदी विचार

 


आनंदी विचार

वृत्त एकसत्ता न्यूज 

संकलक : आकाश भाग्यवंत नायकुडे 

अकलूज दिनांक 03/07/2026 :

ज्ञान असेल तर फक्त शब्द समजतात आणि अनुभव असेल त्याचा अर्थ. जीवन जगताना जगाचा जास्त विचार करू नका, कारण जग ज्याच्याकडे काही नाही त्याला हसतं. आणि ज्यांच्याकडे सर्व काही आहे त्यांच्यावर जळतं,

आयुष्याचा खरा आनंद भावनेच्या ओलाव्यात असतो. कुठलचं नातं ठरवून जोडता येत नाही, ते आपोआप जोडलं जातं. खरी आपुलकी, माया ही फार दुर्मिळ असते. हे दान ज्याला लाभतं, त्यालाच त्यातला खरा आनंद मिळवता येतो.

साथ देणारी माणसं विकत घेता येत नाहींत ती सन्मानाने कमवावी लागतात.                                                                   संकटं ही प्रत्येकाच्या आयुष्यात येतात, पण जे आपल्या विचारांनी खंबीर राहतात, तेच संकटांवर मात करून इतिहास घडवतात.

ज्या व्यक्तीच्या अंगात दुसऱ्याला सन्मान देण्याची आणि आपल्याकडून झालेल्या चुकीची क्षमा मागण्याची क्षमता असते, ती व्यक्ती सर्वांना आवडणारी आणि प्रिय असते. कारण या दोन्हीं गोष्टी माणसाचा खरा स्वभाव दाखवतात.

मोठेपणा हा वयाने किंवा पैशाने येत नाही, तो विचारांची उंची आणि समाजसेवेच्या भावनेतून निर्माण होतो.

असलेल्या परिस्थितीत सुखाने जगायची सवय लागली की नसलेल्या गोष्टीचे दुःख कधीच जाणवत नाही.

कोणत्याही माणसाचा रंग पाहून स्वभाव शोधू नका. कारण निष्ठावंत आणि चांगली लोक हे बहुतेक साधारणच असतात.

प्रामाणिकपणामुळे उध्वस्त झालेली माणसं अभिमानाने शेवटपर्यंत प्रामाणिकच राहतात.

आयुष्य जगण्याचा एकच नियम आहे. मन मोकळं ठेवा आणि विचार शुद्ध ठेवा.

संघर्ष हे निसर्गाचं आमंत्रण आहे, जो स्वीकारतो तोच पुढे जातो.

शांतता हे प्रत्येक प्रश्नाला दिलेलं सुंदर उत्तर असतॆ आणि संयम हे परिस्थितीला दिलेलं प्रत्युत्तर असतॆ,

✍️ प्रा. एस. एम. पाटील

      देवगाव, तालुका-पारोळा (जळगाव)  

 संकलन : प्रविण सरवदे, कराड,

  

=====================

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या