सखाराम खोत यांचे निवासस्थानातील सन्मान
वृत्त एकसत्ता न्यूज
आकाश भाग्यवंत नायकुडे
अकलूज दिनांक 09/07/2026 : इंदापूर तालुक्यातील डिकसळ येथे नायकुडे 卐 वाघमोडे यांच्या लग्न सोहळ्यासाठी जात असताना पळसदेव येथील ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते आणि वर्ल्ड धनगर सोशल ऑर्गनायझेशनचे राष्ट्रीय प्रवक्ते सखाराम खोत यांचे निवासस्थानी गुरुवार दिनांक 9 जुलै 2026 रोजी सन्मान सोहळा संपन्न झाला.
याप्रसंगी भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे माळशिरस तालुका अध्यक्ष गिरीश प्रभाकर शेटे, अकलूज वैभव आणि वृत्त एकसत्ताचे संस्थापक संपादक व ज्येष्ठ सेवा जेष्ठ पत्रकार भाग्यवंत लक्ष्मण नायकुडे, युवा नेते यशराज गिरीश शेटे यांचा सन्मान सखाराम खोत यांच्या हस्ते करण्यात आला. तत्पूर्वी कृषी, सामाजिक, राजकीय इत्यादी विविध विषयांवर चर्चा झाली.


0 टिप्पण्या