विचारधारा

 


विचारधारा

वृत्त एकसत्ता न्यूज 

संकलक : आकाश भाग्यवंत नायकुडे 

अकलूज दिनांक 01/07/2026 :

आपण बाहेर निघालो, शाळेत निघालो, लग्नाला किंवा वाढदिवसाला निघालो की त्या-त्या प्रमाणे आवरतो, तयार होतो. आवरले की आरशात पाहतो व बाहेर पडतो. बाह्यरूप सजवणे तसे सोपे असते.

अवघड असते ते आतून सजवणे. मन सजवणे सोपे नसते. आपल्यावरील संस्कार, आपली नैतिक मूल्ये, आपली संवेदनशीलता, नम्रता, प्रामाणिकपणा, देशप्रेम वगैरे अनेक सद्गुणांनी व सदाचाराने आपले चारित्र्य घडते.

मुलांनो, आपला स्वभाव व आपले वर्तन यामधून आपण कसे आहोत हे सिद्ध होते. आपल्या दिसण्यापेक्षा आपले असणे महत्त्वाचे असते. वय वाढेल तसे सौंदर्य कमी होत जाते पण सद्गुण आपली कधीच साथ सोडत नाहीत.

बाह्य सौंदर्यापेक्षा मनाचे सौंदर्य महत्त्वाचे असते. ते वाढवा, जपा व स्वतःला घडवा.

सौ. स्नेहलता स. जगताप.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या