"सासू सून" यांचे पण 36 गुण जुळायला हवेत! जसे वधु वराचे असतात"ह



 "सासू सून" यांचे पण 36 गुण जुळायला हवेत! जसे वधु वराचे असतात"

वृत्त एकसत्ता न्यूज 

संकलक : आकाश भाग्यवंत नायकुडे 

अकलूज दिनांक 05/07/2026 :

लग्न जमवताना आपण वधू वराचे 36 गुण जुळतात का हे पाहतो. पण एक महत्वाचे, गुणमिलनाचा विषय आपण विसरतो 'सासू आणि सून' यांचे गुण किती जुळतात?

हो, ऐकायला थोडं वेगळं वाटेल, पण ही मांडणी प्रत्येक घरासाठी आणि प्रत्येक स्त्रीसाठी खूप उपयोगी आहे.  कारण सासूबाई आणि सून यांचे गुण का जुळावेत बर ?

कारण जेव्हा एक स्त्री दुसऱ्या स्त्रीशी जोडली जाते, जी सासू  तिच्या आईसारखी असावी अशी अपेक्षा असते, आणि दुसरीकडे एक आई पुत्राच्या निवडीला स्वीकारून सूनेला लेकीसारखं मानण्याचा प्रयत्न करते.

पण या नात्यातही काही "गुण" जुळायला हवेतच, ज्यामुळे हे नातं फुलतं, बहरतं आणि घराला खऱ्या अर्थानं ‘गृहसौख्य’ लाभतं.

सासू सून यांचे "अदृश्य गुण" कोणते असावेत?

यासाठी आपण थोडं वेगळेपणाने "36 गुणमिलन" करूया, ज्यात खालील गुणाचा विचारात करू यात.

समजूतदारपणा असावा, एकमेकांच्या चुका स्वीकारण्याची तयारी असावी व ऐकून घेण्याची कला ही फक्त बोलणं नाही तर ती ऐकणंही महत्त्वाचं आहे. एकमेकींवर विश्वास, शंका न करता प्रेमाने नातं निभावणं. स्वतःची जागा समजून घेणं  सूनेला घरात आदर द्यावा आणि सुनेने सासूच्या अनुभवांचे मार्गदर्शन स्वीकारावं. प्रेम हे न मागता द्यावं, आईसारखं वागणं आणि लेकीसारखं समजून घेणं हे पण महत्त्वपूर्ण आहे.

सासू , केवळ सासू नाही तर ती अनुभवसंपन्न मार्गदर्शक असते. ती घराचा कणा असते. तिच्या मनात मुलासाठी असलेलं प्रेम सूनेवरही असू शकतं, फक्त तिला सुनेने जरा वेळ प्रेमाने समजून घ्यायला हवं, सून, फक्त नवी सखी नाही, तर नवीन संस्कृती घेऊन आलेल ते एक बहरते फुल असते. तिच्यावर जबाबदाऱ्या असतात, पण त्या सांभाळताना जर तिच्या प्रेमाला, बोलण्याला, चुकांना समजून घेतलं, तर तीही घराचं घरपण गोंडस रुप बनवू शकते.

खरं सांगायचं तर, कुंडलीत 36 गुण जुळले तरी नातं यशस्वी होईलच याची शाश्वती नाही. पण जर सासू सून यांच्यात "मनाचे 10 गुण" जरी जुळले तरी ते नातं आयुष्यभरासाठी समाधान देणारं ठरतं.

सासू सून मनाने एकत्र जुळल्या की घर पण जुळतं, आणि घर जुळलं की कौटुंबिक आयुष्य ही फुलतं! जर हे नातं दोघींच्याही जाणीवा आणि प्रेमाने घडवलं, तर "सासू सून" ही संकल्पना नात्याचा बंध न बनता, आई-लेकीचं गोड गाठोडं ठरतं, स्त्रीला स्त्रीच समजू शकते, ती शत्रू नव्हे ! सखी होऊ शकते!

बदल आपल्यापासूनच सुरू होतो. "सासूबाईंची माफी आणि सुनेची समजूत" यांच्यातूनच खरं कुटुंब घडतं."

लेखक- सुनिल पुणे TM 9359850065,

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या