22 वर्षापासून रत्नत्रय परिवाराने जोपासली अखंड अन्नदानाची परंपरा


22 वर्षापासून रत्नत्रय परिवाराने जोपासली अखंड अन्नदानाची परंपरा 

वृत्त एकसत्ता न्यूज

आकाश भाग्यवंत नायकुडे

अकलूज दिनांक 25/7/2026 :

 सोमवार दिनांक 20 जुलै रोजी  संत ज्ञानेश्वर महाराज पालखी चे सदाशिवनगर मध्ये आगमन झाले. वारकऱ्यांना घरगुती जेवणाचा आस्वाद मिळावा या हेतूने रत्नत्रय परिवार गेल्या 22 वर्षांपासून ही अन्नदानाची परंपरा जोपासत आहे.

रत्नत्रय एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष अनंतलाल रतनचंद दोशी, रत्नत्रय पतसंस्था चेअरमन व सदाशिवनगरचे प्रथम नागरिक विरकुमार अनंतलाल दोशी, रत्नत्रय एज्युकेशन सोसायटी सचिव प्रमोद  अनंतलाल दोशी, रत्नत्रय  परिवाराच्या सौ. मृणालीनी दोशी, सौ. पुनम दोशी यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम चालू आहे.


यामध्ये रत्नत्रय इंग्लिश मीडियम स्कूल व ज्युनिअर कॉलेज मांडवे च्या विद्यार्थ्यांनी आणलेला झुणका भाकरी,ठेचा,लोणचे तसेच रत्नत्रय परिवारातर्फे बिस्कीट, राजगिरा लाडू इत्यादी वाटप करण्यात आले.

 यावेळी रत्नेश दोशी, पुष्कर दोशी, निर्जरा  दोशी,श्रुती दोशी, रत्नत्रय इंग्लिश मिडीयम व कनिष्ठ महाविद्यालय मांडवे चे मुख्याध्यापिका सविता देसाई, सचिव ज्ञानेश राऊत, विलासचंद्र एम मेहता दहिगाव चे प्राचार्य गजेश जगताप, माने, विक्रम पालवे , पोळ, नाळे,  सचिन पालवे, उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या