✍️ HAPPY THOUGHTS आनंदी विचार

 

✍️ HAPPY  THOUGHTS आनंदी विचार

वृत्त एकसत्ता न्यूज 

संकलन : आकाश भाग्यवंत नायकुडे 

अकलूज दिनांक 03/06/2026 :    

काही माणसं लाखात एक असतात आणि काहींकडे लाख असले तरी ते माणसात नसतात. म्हणूनच माणसाने माणुसकीचे नाते मनापासून जपले तरच आयुष्यात आठवणी सुंदर होतात आणि निर्माण होतात नवीन जीवाभावाचे स्नेहबंध.

काही समस्या नमस्कार करून सोडवल्या पाहिजेत. सर्व लोक तुमच्या उंचीइतकेच नसतात.

जीवनाचे सर्वात मोठे रहस्य म्हणजे आपण कोणासाठी जगतोय हे आपल्याला माहित असते. पण आपल्यासाठी कोण जगत आहे हे आपल्याला कळत नाही.

फसवणुकीच्या कलियुगाचा प्रसाद सर्वांना एक, एक करून मिळेल. आज माझी पाळी आहे आणि उद्या तुमचीही असेल.

चांगल्या लोकांना का नाकारले जाते, कारण ते चुकीचे सहन करत नाहीत आणि चुकीचेही करत नाहीत, म्हणूनच त्यांना खूप कमी लोक आवडतात.

अनेकदा मी पणामुळे आपलं नातं धोक्यात येतं. भांडण कोणामुळे झालं यापेक्षा ते कसे मिटवता येईल, यावर लक्ष द्या. नात्यात कधी कधी हरणं म्हणजे पराभव नसतो. तर तो समोरच्या व्यक्तीला जिंकून देण्याचा एक मार्ग असतो. जिथे ईगो मोठा असतो, तिथे प्रेम हळूहळू कमी व्हायला लागतं. म्हणून नात्यात नेहमी प्रेम श्रेष्ठ ठेवा आणि अहंकाराचा त्याग करा.

नातं जपण्यासाठी कधी कधी झुकावं लागतं. पण ते झुकणं कमजोरी नसते तर समोरच्या व्यक्तीची आपल्या आयुष्यातली किंमत असते.

नातं हे काचेसारखं असतं, एकदा तडा गेला की तो आयुष्यभर दिसतो. एकमेकांवर संशय घेण्यापेक्षा मनातल्या शंका स्पष्टपणे बोलून दाखवा. जेव्हा तुम्ही एकमेकांशी पारदर्शक असता, तेव्हा तिसऱ्या व्यक्तीला तुमच्या नात्यात जागाच उरत नाही. विश्वास हा कमवावा लागतो. आणि तो टिकवण्यासाठी दररोज प्रयत्न करावे लागतात.

  प्रा. एस. एम. पाटील 

  देवगाव, तालुका-पारोळा (जळगाव)

  संकलन : प्रविण सरवदे, कराड

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या